गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांचे आक्रमक भाषण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोपीनाथ गडावर जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना आज ता. ०३ भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परत एकदा त्यांची भूमिका स्पष्ट करत सुरू असलेल्या चर्चा, येत असलेल्या बातम्या यावर नाराजगी व्यक्त करत, या सर्वांचा मला कंटाळा आला असून ज्या वेळेस मला भूमिका घ्यायची आहे. त्यावेळेस मी घेणारच. सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने मी माझ्या नेत्यांशी संपर्क साधणार असून त्यांच्याशी या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं मत यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल. यासह सत्तेसाठी मी कुणापुढे झुकणार नाही अशीही भूमिका यावेळी पंकजा मुंडे यांनी घेतली. यासह इतरही विषयांचा सविस्तर आढावा घेत अनेकांवर निशाणा साधला.