भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना अपयश
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : अंबाजोगाई बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी 15 जागांवर आमदार धनंजय मुंडे यश आले असून उर्वरित तीन जागांवर भाजपाला यश मिळवता आले आहे. 18 पैकी 15 जागा आमदार धनंजय मुंडे यांच्या निवडून आल्यामुळे पंकजा मुंडे यांना मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची पूर्व परीक्षा म्हणजे बाजार समितीची निवडणूक असल्याचै तज्ञांकडून मानली जात आहे. यामुळे भविष्यामध्ये 2024 ची निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.