संदीप क्षीरसागर यांचे ग्रामपंचायतचे चार उमेदवार विजयी; उर्वरित निकालाकडे सर्वांचे लक्ष
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड बाजार समिती निवडणुकीमध्ये चौक नियोजन करत शेतकऱ्यांच्या फायद्याचे व त्यांच्या कायम संपर्कात असलेले उमेदवार या निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिले होते. बीड बाजार समितीसाठी काल निवडणूकपार पडली होती. सध्या निकाल येण्यास सुरुवात झाली असून आमदार क्षीरसागर यांना पहिल्याच टप्यात मोठे यश मिळाले असून ग्रामपंचायत मतदार संघात चार पैकी चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे ४० वर्षाच्या सत्तेला पुतणे संदिप क्षीरसागर यांनी सुरुंग लावला आहे. ही हार माजी मंञी जयदत्त क्षीरसागरांना साठी मोठी हार ठरणार आहे. उर्वरित निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकर चिञ स्पष्ट होणार आहे.