–आमदार संदिप क्षीरसागरांच्या चोक नियोजनामुळे विरोधकांची धाकधुक वाढली
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांपैकी नऊ बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यातील सहा बाजार समित्यांची निवडणूक आज होत असून दुपार पर्यंत जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरु होती. नऊ बाजार समित्यांपैकी कडा बाजार समिती बिनविरोध झाल्याने आठच समित्यांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यातील सहा बाजार समित्या म्हणजे बीड, केज, गेवराई, वडवणी, अंबाजोगाई व परळीसाठी आज (ता. 28) मतदान घेण्यात येत आहे. यातील वडवणीचा निकाल लगेच लागणार असून बीड, केज, वडवणी, अंबाजोगाई व परळीचा निकाल उद्या लागणार असल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह माजलगाव व पाटोदा बाजार समितीसाठी रविवारी (ता. 30) मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. बीड बाजार समितीसाठी तीन ठिकाणी 12 केेंद्रावर मतदान होत असून या ठिकाणी दुपारपर्यंत शांततेत मतदान सुरु होते. विशेष म्हणजे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या चोक नियोजनामुळे मात्र विरोधकांची धाकधूक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उद्या निकाल लागणार असल्यामुळे सहा बाजार समित्यांमध्ये कोणाला यश येते हे मात्र उद्याच स्पष्ट होणार आहे.
पहिल्याच वेळेस जिल्ह्यातील दहा पैकी नऊ बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया होत असून यातील कडा बाजार समिती बिनविरोध काढण्यात आमदार सुरेश धस यांना यश मिळाले आहे. उर्वरित आठ बाजार समित्यांसाठी आज व रविवारी मतदान होणार आहे. यातील बीड, केज, गेवराई, परळी, वडवणी, अंबाजोगाई या सहा बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे. तर माजलगाव व पाटोदा बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार आहे. दुपार पर्यंत जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु होती. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतिने चोक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बीड बाजार समिती मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदिप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून परळी मध्ये आमदार धनंजय मुंडे व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, गेवराई माजी आमदार अमरसिंह पंडीत व आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार बदामराव पंडीत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासह केज मध्ये आमदार नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांचा गट राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी सुद्धा तिसरा पर्याय दिला आहे. माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सांळूके व मोहन जगताप, पाटोद्यात आमदार सुरेश धस व बांगर, वडवणीत आमदार प्रकाश साळूंके व मुंडे यांच्यात लढत होत आहे. या आठ बाजार समित्यांमध्ये सर्वच नेत्यांनी पुर्ण ताकद पणाला लावली आहे. यात कोणाला किती यश मिळते हे मात्र निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे.
निवडणूक प्रक्रीयेत 444 कर्मचाऱ्यांचा सहभाग
जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी 444 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून बीड बाजार समितीसाठी तीन ठिकाणी 12 केेंद्रावर 107 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. गेवराई शहरातील सात केंद्रांवर 67 कर्मचारी, वडवणीत चार केंद्रांवर 27 कर्मचारी, परळीत आठ केंद्रांवर 72 कर्मचारी, अंबाजोगाईत 13 केंद्रांवर 123 कर्मचारी, केज मध्ये आठ केंद्रांवर 67 कर्मचारी असे एकूण 52 केंद्रावर 444 कर्मचारी नियुक्त असून सर्वच ठिकाणी दुपार पर्यंत शांततेत मतदान सुरु होते.
या बाजार समित्यांचा निकाल उद्या!
बीड जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून यातील वडवणी बाजार समितीचा निकाल मतदान झाले की लगेच लागणार आहे. तर बीड, केज, गेवराई, परळी व अंबाजोगाई या पाच बाजार समित्यांचा निकाल उद्या लागणार आहे. दुपार पर्यंत जिल्ह्यात सहाही बाजार समित्यांसाठी मतदान शांततेत झाले होते. सर्वच नेत्यांनी या निवडणूकीसाठी पुर्ण ताकद लावली असून कोणाला किती यश मिळते हे मात्र उद्याच स्पष्ट होणार आहे.