• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, April 23, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

Prarambh Team by Prarambh Team
November 29, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीडच्या बशीरगंजमध्ये विराट जाहिर सभा

बीड प्रतिनिधी – मी तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुम्हाला ऐकायचे असेल तर एैका, मी बारामतीत करून दाखवले आहे, मी पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवले आहे ते मला बीडमध्ये करायचे आहे. तुमची साथ असेल तर मी बीडमध्ये विकास करून दाखवेन, हा अजित पवारचा शब्द आहे आणि मी शब्दाला पक्का आहे, मी करून दाखवतो, मला फक्त संधी द्या. इथल्या सत्ताधाऱ्यांनी 35 वर्षे आपल्या लोकांना वाऱ्यावर सोडून इथले मुलभूत प्रश्न रखडत ठेवले, आत्मपरिक्षण करा, डोळे उघडा, आता चांगली संधी आलेली आहे. माझ्या विचाराच्या माणसाला निवडून द्या, काळजी करू नका स्वतः उभे आहात असे समजून सद्सद्‌‍ विवेक बुध्दीने मतदान करून मला बीडचा चेहरा-मोहरा बदलण्याची संधी मला द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी विराट संख्येने उपस्थिती असल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे.

बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या 52 उमेदवारांच्या प्रचारार्थ ना.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बशीरगंज चौक येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजीमंत्री नवाब मलिक, आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संजय दौड, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती ज्योतीताई मेटे,  शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, अल्पसंख्यांक आघाडीचे शेख निजाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक फारुक पटेल, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा प्रिया डोईफोडे, रेखा फड, माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, दिलीप गोरे, झुंजार धांडे, सुहास पाटील, भागवत तावरे, पांडुरंग आवारे, सुनिल मगरे, गोरक्ष लोखंडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, बीड शहरात अनेक प्रश्न रखडत पडलेले आहेत. रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहेत, मुला-मुलींना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, उद्यान नाही, आलेला निधी खर्च केलेला नाही, रस्त्याच्या बाजूला झाडे लावलेली नाहीत असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांनी 35 वर्षे बीडची अवस्था बकाल करून टाकली, बारामती, पिंपरी चिंचवडचा विकास होवू शकतो मग बीडचा का नाही होवू शकत नाही ? असा प्रश्न उपस्थत करून तिकडे व्हिजन असणारे लोक आहेत आणि इकडे लोकांना वाऱ्यावर सोडून स्वतःचे घर भरणारे लोक असल्यामुळे आपली अवस्था अशी झालेली आहे. या भागातील खासदार झाले, आमदार झाले यांनी आत्तापर्यंत काय केले ? झोपा काढल्या का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्ञानराधा, साईराम, माँसाहेब आणि छत्रपती अशा पतसंस्थांच्या कुटे, परभणे, शिंदे आणि भंडारी या लोकांनी सामान्य लोकांचा पैसा लुटला. त्यातल्या तिघांना आम्ही जेलमध्ये पाठवले, एक फरार आहे. चुकीला माफी नाही, काम करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेंव्हा सुधारणा होतील आणि सुधारणा करण्यासाठी आपल्या विचाराची माणसं नगर परिषदेत पाठवावी लागतील. तुम्ही कचरा निर्माण करणाऱ्या माणसाला निवडून द्याल तर या बीडचा कचरा होईल स्वच्छता करणाऱ्या स्वच्छ विचाराच्या माझ्या माणसांना विजयी करा असे सांगून हावसे-नवसे-गवसे येतील, रात्रीतून गडबड करतील त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, येणाऱ्या 2 तारखेला घडी आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरचे बटन दाबून मला काम करण्याची संधी द्या असे कळकळीचे आवाहन ना. अजितदादा पवार यांनी केले.
यावेळी बोलताना माजीमंत्री नवाब मलिक म्हणाले की, ही निवडणुक बीडचे भविष्य बदलणारी निवडणुक आहे, मनात किंतु-परंतु न ठेवता, प्रशासकीय अनुभव असणाऱ्या प्रेमलता पारवे यांच्यासह मित्रपक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा. ना. अजितदादा पवार यांच्यासारखा विकास पुरुष आपल्या पाठिशी आहे, त्यांच्या माध्यमातून बीडची बारामती करा, सर्व धर्म समभाव विचार घेऊन आम्ही, सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहोत, तेंव्हा आपल्या विचाराची माणसं सत्तेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना डॉ.ज्यातीताई मेटे म्हणाल्या की, विरोधकाने नगर पालिकेचा वापर स्वार्थी राजकारण करण्यासाठी केला, अटल अमृत योजनेचा निधी कुठे गेला ? याचा जबाब तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. विकासाचा ताळेबंद घेऊन चर्चा करा, बीड नगर परिषदेमध्ये परिवर्तन करण्याची संधी चालून आलेली आहे. त्यासाठी घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी दिलीप गोरे व भागवत तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच सतिष क्षीरसागर, गौतम मोरे, आरेफ खान, फेरोज खान यांनी ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

ना. अजितदादा पवार यांच्या माजलगाव, धारुर येथील जाहिर सभा झाल्यानंतर त्यांनी बशीरगंज चौकात जाहिर सभेच्या ठिकाणी आगमन होताच लगेच भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी बीडमध्ये काय करायचे आहे याचा विकास आराखडाच मांडला. त्यांच्या या सभेला महिला, पुरुष मतदार व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभास्थळी मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि उत्साह राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे.





Previous Post

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

Next Post

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
Next Post
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा