प्रभाग क्रमांक 25 म्हणून निवडणूक लढवणार…
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : काही लोकप्रतिनिधी त्यांच्या कामातून, एक ओळख निर्माण करून कायम लोकांच्या मनामध्ये घर करून राहतात. बीड नगरपालिकेत कायम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे. असे विनोद मुळक हे येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग 25 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा गराडा कधीच पाहायला मिळत नाही, त्यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य मतदार कायम त्यांच्या संपर्कात असतो, मतदारसंघात येणाऱ्या अडी, अडचणी ते कायम दूर करत असतात, यामुळे अनेक वर्षापासून ते बीड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यादरम्यान सभापती सह इतर पदही भूषवली आहेत. बीड शहरात त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. शिवराज पान सेंटर या ठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण असावे यासाठी त्यांनी पेन्शन पार्क उभारले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने निवांत वेळ घालवण्यासाठी वयोवृद्ध नागरिक, युवक, महिला निवांत वेळ घालवण्यासाठी येतात मॉर्निंग वॉक साठी सुद्धा या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये मूलभूत समस्या मार्गी लावलेले आहेत. यामुळे या निवडणुकीत विजय खेचून आणताना त्यांना अडचणी येणार नाहीत असे सध्या तरी दिसत आहे.
















