• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, July 27, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

माझा विजय स्वाभिमानी मतदारांना समर्पित – आ. विजयसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
November 24, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गेवराई  प्रतिनिधी : कार्यकर्त्यांचे परिश्रम, आदरणीय भैय्यासाहेब यांचे परफेक्ट नियोजन आणि मतदारांचा विश्वास यामुळे विजय मिळाला. आजचा विजय गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम स्वाभिमानी मतदारांना समर्पित करत आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केली. या विजया मुळे आजवरचे सर्व राजकीय हिशोब चुकते केले आहेत. आदरणीय शिवाजीराव दादांचे स्वप्न साकारले आहे. मोठी जबाबदारी मतदारांनी दिली आहे ती सार्थ करण्याचा नक्की प्रयत्न करणार असल्याचे भावना जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित यांचा मोठा विजय झाल्यानंतर ते बोलत होते. गढी पासुन ते गेवराई शहरात भव्य मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी हा आनंद साजरा केला. विजयसिंह पंडित यांनी मतदारांसह नेत्यांचे आभार व्यक्त केले.

गेवराई विधानसभा मतदारसंघा साठी झालेल्या मतमोजणी साठी प्रारंभी पासूनच विजयसिंह पंडित यांनी मोठी आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत कायम ठेवली आणि प्रत्येक फेरी अखेर ती वाढतच गेली. विजयसिंह पंडित यांना एकूण १,१६,१५१ मते मिळाली असून त्यांनी ४२,३९० मतांनी विजय मिळवला. मतमोजणी दरम्यान कार्यकर्ते आणि मतदार यांनी मोठा जल्लोष केला. गढी येथील मतमोजणी केंद्रापासून पासुन नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गेवराई शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला.
नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी हा विजय स्वाभिमानी मतदारांना समर्पित केला आहे. कायम जनतेच्या सेवेत राहणार असल्याचे त्यांनी सांगून या निवडणूकीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

*प्रमाणपत्र बहाल*
===========
यावेळी निवडणूक निरीक्षक लालटनपुई वाँगचाँग, निवडणूक निर्णय अधिकारी सतिश धुमाळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार संदिप खोमणे यांच्या हस्ते विजयसिंह पंडित यांना निवडणूकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरिक्षक तथा संपर्क अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम मांडूरके यांच्या सह निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व निवडणुक कर्मचारी आणि अधिकारी यांचे आ. विजयसिंह पंडित यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, माझ्या विजयामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, ना. धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ‌. पंकजा मुंडे यांच्यासह मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींचा मोठा वाटा आहे. मला तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला मतदारसंघांमध्ये माझ्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर अपप्रचार झाला, जात पात धर्म यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मायबाप मतदारांनी जात पात धर्म या पलीकडे जाऊन मला आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार आहोत या भावनेतून काम केल्यामुळे मी हा विजय मिळवू शकलो. शिवछत्र परिवार जात पात धर्म यापलीकडे जाऊन काम करतो हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिले आहे. यापुढील काळात आपण सकारात्मक काम करुन मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगून गेवराई विधानसभा मतदारसंघातीलया सर्व समाजातील मतदार बांधवांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मला मिळालेल्या संधीचे मी सोने करेल असेही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले

यावेळी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींनी विजयवर
विश्वास टाकला त्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार मानतो. आ. विजयसिंह पंडित यांचा हा विजय ऐतिहासिक आहे या विजयामुळे मला मनस्वी आनंद होतो आहे. आज १९९५ च्या निवडणुकीची मला आठवण झाली. आज या निमित्ताने सगळे हिशोब चुकते झाले. निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला शब्द पूर्ण करण्याचा विश्वास देतो. या ऐतिहासिक निकालामुळे शिवछत्र परिवाराच्या सातबारावर तुम्ही तुमचे नाव कोरले आहे, तेव्हा यापुढे विकासाची कामे तर होतीलच परंतु सामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

*गढी ते गेवराई*
*विजयी जल्लोष*
===========

याप्रसंगी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली. गढी ते गेवराई निघालेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. विजयसिंह पंडित यांच्या विजयानंतर गेवराई आणि बीड येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित जयभवानी कारखान्याचे संचालक जयसिंग पंडित यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले.

Previous Post

परळी विधानसभा लढवत असलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण द्या – धनंजय मुंडेंचे एसपी बारगळ यांना पत्र

Next Post

“आष्टीत कोणी कितीबी येऊ द्या, एकच बास ” चा नारा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
“आष्टीत कोणी कितीबी येऊ द्या, एकच बास ” चा नारा

"आष्टीत कोणी कितीबी येऊ द्या, एकच बास " चा नारा

महायुतीच्या अभूतपूर्व विजयाचा अनिलदादा जगताप यांच्याकडून जल्लोष साजरा!

महायुतीच्या अभूतपूर्व विजयाचा अनिलदादा जगताप यांच्याकडून जल्लोष साजरा!

सुरेश धस आमदार झाले अन् त्यांने चप्पल घातली

सुरेश धस आमदार झाले अन् त्यांने चप्पल घातली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा