तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा सेवेची संधी द्या
पेठबीडमधील मातोश्री मंगल कार्यालयातील कॉर्नर बैठकीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
बीड प्रतिनिधी : यापूर्वी तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच बीड मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित अनेक प्रश्न आपल्याला मार्गी लावला आहे. विकासकामे पुर्णत्वास नेता आली. आता असाच आशिर्वाद पाठीशी ठेवून येत्या बुधवार दि.२० नोव्हेंबरला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा. आपल्या प्रत्येक मताचा आदर करत मी बीड मतदारसंघांला विकासाच्या आणखी उंचीवर घेवून जावून सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेे असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी पेठ बीडमधील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित कॉर्नर बैठकीत केले. याच सभेत वार्ड क्रं १७ मधील आमेर सय्यद व अरबाज शेख यांनी आ.संदीपभैय्यांचे नेतृत्व स्वीकारुन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.
बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१५) बीड शहरातील मातोश्री मंगल कार्यालय, पेठ बीड येथे कॉर्नर बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून संवाद साधला.याप्रसंगी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्ते,मतदारांशी पुढे बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, निवडणूक आता अंतीम टप्प्यात आली आहे. आता आपण सर्वांनी आपला पक्का निर्धार करुन पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विचारांची सत्ता आणण्यासाठी आपले मतदान वाया जाणार नाही यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे निश्चित करावे. आपले विरोधक इतके दिवस आपल्यावर अनेक आरोप करत आले आहेत. आता तर निवडणूक आहे, मतदारांची दिशाभूल करुन ते आरोप,टिका करतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा,आरोप करुन मतदान मिळेल हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असेन,पण मतदारसंघातील आपण सुजान मतदार बंधू तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून मला ओळखता.त्यामुळे विरोधकांचे असे केविलवाणे प्रयत्न आणून पाडण्याची भूमिका घेवून पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही याप्रसंगी संदीप क्षीरसागर यांनी केले.
आपला बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघ कायम आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या भूमिकेसोबत,विचारांसोबत राहिलेला आहे. आता संघर्षाच्या स्थितीतही आपण त्यांच्यासोबत कायम राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचा व महाविकास आघाडीचा बीडचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी आहे. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी वार्ड क्रं १७ मधील आमेर सय्यद व अरबाज शेख यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पक्षात स्वागत केले.