शरीफ भाईंची घरवापसी, जोमाने काम करणार
परळी – परळीतील एम आय एम चे नेते व माजी नगरसेवक शेख शरीफ यांनी एम आय एम ला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी शरीफ भाईंचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शरीफ भाई हे पूर्वाश्रीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्ते होते त्यामुळे परत एकदा घर वापसी केल्यामुळे आपण आनंदी असून आता धनंजय मुंडे यांचे निष्ठेने व अधिक जोमाने काम करणारा असून या निवडणुकीत मी व माझ्या सर्व सहकारी तन-मंदनाने धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहतील असा शब्द यावेळी शरीफ भाईंनी दिला.
यावेळी शेख शरीफ, वाजेद खान, मुसा भाई, निसार पठाण, पापा ठाकूर, जमील अध्यक्ष, हाजी बाबा, शेख जमिल, युनूस खान, लायक खान यांसह आदी उपस्थित होते.