• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

दवाखान्यात घुसून रुग्णावर हल्ला; गुंडांना पोलिसांनी घडविली ‘अद्दल’

Prarambh Team by Prarambh Team
October 8, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड शहर पोलिसांनी २४ तासात ठोकल्या चौघांना बेड्या

बीड प्रतिनिधी : रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यास एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कट मारून खाली पाडत जखमी केले. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन जखमी दुचाकीस्वारासह त्यांच्या नातेवाईकांना १०-१२ अज्ञात गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार बीड शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सोमवारी (दि.७) सकाळी साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपी निष्पन्न करत अवघ्या २४ तासात टोळक्यातील ४ गुंडांना बेड्या ठोकत चांगलीच ‘अद्दल’ घडविली.

रामेश्वर परमेश्वर कदम (वय ३६ रा.शिदोड ता.बीड) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी शहरातील एका खाजगी शोरूममध्ये नोकरी करतात. नेहमीप्रमाणे हे दाम्पत्य दुचाकीवरून बीडमध्ये आले होते. रस्त्यात असताना दोन तरुणांनी सतत दुचाकी मागे-पुढे करत दाम्पत्याचा पाठलाग केला. त्या दोघांनी मोंढा रोडवरील बिंदुसरा नदीच्या पुलावर असताना दाम्पत्याच्या दुचाकीला कट मारत खाली पाडून गंभीर जखमी केले. त्याठिकाणाहून रामेश्वर कदम हे जखमी पत्नीला घेऊन शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी गेले. पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषधी घेण्यासाठी खाली मेडिकलमध्ये गेले असता दुचाकीवर येऊन कट मारत खाली पडणाऱ्या दोन अज्ञात तरुण त्यांच्यासोबत दहा-बारा गुंड घेऊन आल्याचे दिसले. त्या टोळक्याने फिर्यादीस चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना विरोध केला असता सलाईन लावण्याच्या रॉडने डोक्यात व नाकावर मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना देखील टोळक्याने मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामेश्वर कदम यांच्या तक्रारीवरून १०-१२ अज्ञात गुंडांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतीने फिरविली. सपोनि.बाबा राठोड, सहायक फौजदार बाबासाहेब सिरसाट, पो.कॉ. आशपाक सय्यद, मनोज परजने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तर सायबर सेलचे पो.कॉ.विक्की सुरवसे यांनी तांत्रिक माहिती तपासून आरोपी निष्पन्न केले. आरोपींचा अवघ्या २४ तासात शोध घेत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित आरोपींना शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी निघाले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले. हल्ला करणाऱ्या टोळक्यातील आनंद बाबुराव दहिवाळ, मंगलसिंग लक्ष्मणसिंग कपूर, आशिषसिंग किरणसिंग कपूर, संग्रामसिंग भारतसिंग कपूर (सर्व रा.नागोबा गल्ली, पेठ बीड) अशी चार आरोपीं अटक केले आहेत. सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यातील काही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पेठ बीड भागात गुंडगिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Previous Post

आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

Next Post

बियाणे समिती : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उपससमितीच्या सदस्यपदी गोविंद देशमुख, विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची निवड

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
बियाणे समिती : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उपससमितीच्या सदस्यपदी गोविंद देशमुख, विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची निवड

बियाणे समिती : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उपससमितीच्या सदस्यपदी गोविंद देशमुख, विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची निवड

परळी हा येणाऱ्या काळात दिव्यांगांसाठी सर्वात जास्त सुविधा उपलब्ध करून देणारा मतदार संघ असेल – ना.धनंजय मुंडे

परळी हा येणाऱ्या काळात दिव्यांगांसाठी सर्वात जास्त सुविधा उपलब्ध करून देणारा मतदार संघ असेल - ना.धनंजय मुंडे

बीड रेल्वे स्थानकास भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या नावासाठी माजी सैनिक अनुरथ वीर यांचे तीव्र उपोषण..! प्रशासनानी दखल घ्यावी – राजेंद्र मस्के

बीड रेल्वे स्थानकास भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या नावासाठी माजी सैनिक अनुरथ वीर यांचे तीव्र उपोषण..! प्रशासनानी दखल घ्यावी – राजेंद्र मस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा