बीड प्रतिनिधी :- बीड शहरातील अंबिका चौक- शाहुनगर ते साठे चौक पर्यंतच्या रस्ता व नाली बांधकामाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी शनिवारी (दि.५) रोजी केला.
राज्य महामार्ग २२२ वरून जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री -पारगाव सिरस-बीड एमआयडीसी ते कुर्ला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ बीड शहरातून जातो. बीड शहरातील पांगरी रोड-अंबिका चौक- शाहूनगर हा गजबजलेला भाग या मार्गावरच आहे. या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडल्याने, पाणी साचत होते तसेच वाहतूकीला अडचण निर्माण होत होती. यावर आ.क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून या शहरातील महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. शनिवारी (दि.५) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी विविध मान्यवर तसेच नागरिकांच्या उपस्थितीत येथील रस्ता नाली बांधकामाचा शुभारंभ केला. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, या भागातील अनेक तरूण, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.