सकाळी खांडेंची कथित आॅडिओ क्लिप झाली होती व्हायरल
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : लोकसभा 2024 मध्ये पंकजा मुंडेंना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा धोका दिला, यासह इतर चर्चा असणारी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर सायंकाळी जालना रोड परिसरात असणाऱ्या त्यांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख शितलकुमार बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी बजरंग सोनवणे यांना मदत केली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला यासह धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगड पडल्यानंतर आपलं मतदान वाढेल यासह इतर चर्चा असलेली कथित ऑडिओ क्लिप आज सकाळी वायरल झाले होते, यानंतर खांडेंच्या विरोधात सोशल मीडियावर रोषही पाहायला मिळाला आणि आज सायंकाळी जालना रोड परिसरातील असणाऱ्या त्यांच्या शिवसेना कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.