बीड : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर काही तासातच पीआय उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्विकारला. पदभार घेतल्यानंतर एपीआय गणेश मुंडे यांनी शेख यांचे स्वागत करत पुढील किर्यास शुभेच्छा दिल्या.
बीड जिल्हा पोलीस दलामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख मुख्य भूमिका निभावत असतो. यामुळे या पदावर सक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून संतोष साबळे हे कामकाज पाहत होते. परंतु त्यांची आज अचानक तडकाफडकी बदली करण्यात आले. त्यांच्या जागी परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख उस्मान शेख यांची नियुक्ती करण्यात आली होती, काही तासातच शेख यांनी एलसीबीचा पदभार स्वीकारला परळीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केल्यामुळे या पदावरही ते चांगलं काम करतील अशी अपेक्षा सर्वांना आहे.