पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी
बीड प्रतिनिधी :- वादळी-वारा व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अशी मागणी प्रशासनाकडे केली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नुकसानग्रस्त ग्रामीण भागात विविध ठिकाणी भेट दिली. या अवकाळी पावसामुळे शेतीचे तसेच नागरिकांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनस्तरावरून मदत करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली. दरम्यान संबंधित भागातील रस्त्यांची पाहणीही यावेळी आ.क्षीरसागर यांनी केली.