दिनेशच्या अकाली निधनाने माझा एक सच्चा सहकारी नियतीने हिरावला – मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
वडवणी – वडवणी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश मस्के यांचे नुकतेच अकाली निधन झाले असून, आज राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण येथे जाऊन मस्के कुटुंबियांचे सांत्वन केले.
दिनेश हा माझा एक सच्चा सहकारी होता. दिनेशच्या आजाराबद्दल मला कल्पना होती, सर्वांनी खूप प्रयत्न केले परंतु त्याला दुर्दैवाने यश आले नाही. दिनेशच्या अकाली निधनामुळे माझा एक सच्चा सहकारी नियतीने हिरावून घेतला आहे, अशा भावना यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत स्व.दिनेश मस्के यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मा.आ.केशव दादा आंधळे, मोहनराव जगताप, शेषेराव जगताप, नितीन नाईकनवरे, नारायण शिंदे, भारत जगताप, सुग्रीव मुंडे, सतिश बडे यांसह आदी उपस्थित होते.