नेत्यांच्या पुढे पुढे करून पद मिळवता येते, पण नगरपंचायत निवडणुकीत गल्लीतला उमेदवार निवडून आणायला जनमतही लागते
बीड – महेबूब भाई तुम्हारे उपर बलात्कार, अट्रोसिटी जैसे गंभीर मामलो के केसेस चल रहे है, और चुनाव का मौसम बिगाडने के चक्कर मे, राज्य के बडे नेता पर किचड उच्छालने चले, अपने घर शिषो के छोड कर दुसरो के घर पे पथ्थर फेंकने कहां चले? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष रमीज भाई शेख यांनी शिल्लक राष्ट्रवादीचे विकृत नेते महेबूब शेख यांना खडे बोल सुनावले आहेत.
महेबूब भाई, मोठ्या नेत्यांच्या कानांत लावलाव्या करून, त्यांच्या पुढे पुढे करून पद मिळवता येते मात्र स्वतःच्या गल्लीत नगर पंचायत निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणता येत नाही, तिथे जनमत सोबतीला असावे लागते, असा टोलाही रमीज शेख यांनी लगावला आहे.
राक्षसभुवन येथील बैठकीत बोलताना महेबूब शेख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तीक पातळीवर टीका केली होती. ‘इटका जवाब पथ्थर से मिलेगा’ असे म्हणत रमीज शेख यांनी महेबूबच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात ते पुढे म्हणतात की, महेबूब शेख याच्या पाठीमागे स्वतःचे 10 कार्यकर्ते किंवा 100 मतदान सुद्धा नाही, अनेकांची लूट, फसवणूक असे आरोप आणि बलात्कार, अट्रोसिटी सारखे केसेस त्यांच्यावर सुरू आहेत. मात्र आपली उंची किती याचे भान विसरून राज्यात आपल्या कर्तबगारीने प्रसिद्ध असलेल्या आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करताना महेबूब यांनी आपली पातळी व उंची तपासावी, अन्यथा चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही रमीजभाई शेख यांनी म्हटले आहे.