• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, February 16, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड : जिल्ह्यातील आणखी 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

Prarambh Team by Prarambh Team
November 9, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय; पालकमंत्री धनंजय मुंडेंचा पाठपुरावा यशस्वी

*तीन तालुक्यांचा याआधीच केला होता समावेश*

मुंबई  – जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाचे पडलेले प्रमाण तसेच कोरड्या दुष्काळाचे मापदंड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पाणीसाठे या सर्वांचा विचार करून बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा आज नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीचे आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे आदींसह मदत व पुनर्वसन तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी व अंबाजोगाई या तीन तालुक्यांचा महसूल विभागाने दि.31 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे याआधीच दुष्काळग्रस्त तालुक्यांचा यादीत समावेश केलेला आहे.

त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील उर्वरित परळी, आष्टी, गेवराई, बीड, पाटोदा, शिरूर कासार, केज व माजलगाव या 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा दुष्काळी यादीत नव्याने समावेश करण्यात येणार असून, याबाबत आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात कुठेही समाधानकारक वा पुरेसा पाऊस झालेला नाही. सर्व प्रमुख जलस्रोत रब्बी हंगामाच्या तोंडावरच कोरडे पडतील अशी परिस्थिती आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा अशा अनेक समस्या आगामी काळात जिल्ह्यात उद्भवणार आहेत. जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांचा दुष्काळी म्हणून विचार झाल्याने या भागाला शासनाकडून दुष्काळाच्या मापदंडानुसार मदत मिळेल, ही एक समाधानाची बाब आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे व महसूल विभागाचे विशेषकरून आभार मानतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या माध्यमातून नुकताच सुमारे 3 लाख 90 हजार शेतकऱ्यांना 72 कोटी रुपये इतका (प्रत्येकी 2000) पहिला हफ्ता वितरित करण्यात आला होता. त्यापाठोपाठ 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना नुकताच 241 कोटी रुपये पिकविमा 25% अग्रीम नुसार मंजूर करण्यात आला असून, त्याचे वितरणही नुकतेच सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ सर्व 11 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश मिळाल्याने निश्चितच शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

*या महसुली मंडळांचा समावेश*

आष्टी – आष्टी, कडा, टाकळसिंग, दौलावडगाव, धामणगाव, पिंपळा, धानोरा

बीड – पाली, म्हाळसजवळा, नाळवंडी, राजुरी (न), पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणेश, चौसाळा, बीड

गेवराई – गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा

केज – केज, युसूफ वडगाव, ह.पिंप्री, होळ, विडा, बनसारोळा

माजलगाव – माजलगाव, गंगामसला, किट्टी आडगाव, तालखेड, निथरूड, दिंदरूड

परळी – परळी, धर्मापुरी, सिरसाळा, नागापूर, गाडे पिंपळगाव

पाटोदा – पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर

शिरूर कासार – शिरूर कासार, रायमोह, तींतरवणी

Previous Post

गेवराई ग्रामपंचायत निकालावर अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व

Next Post

मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून खांडे, धांडे, मुळूक यांची निर्दोष मुक्तता

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
Next Post
मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून खांडे, धांडे, मुळूक यांची निर्दोष मुक्तता

मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून खांडे, धांडे, मुळूक यांची निर्दोष मुक्तता

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ

शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ

परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा