• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

Beed : शहरातील दगडफेक, जाळपोळचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे!

Prarambh Team by Prarambh Team
November 3, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दगडफेक, जाळपोळ घटनेत ११ कोटींचे नुकसान!

जाळपोळ, दगडफेक प्रकरणी ३९ गुन्हे नोंद
दगडफक, जाळपोळचे फुटेज, व्हिडीओ, फोटो पाठवण्याचे पोलीस अधिक्षकांचे आवाहन
११९ आरोपींना केले जेरबंद
तीन दिवसानंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरु
बस सेवा झाली सुरु
दगडफेक घटनेत चार पोलीस जखमी, दोन पोलीस वाहनांवर दगडफेक, दोन अग्नीशमक वाहनांची तोडफोड
दगडफेक, जाळपोळीतील आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकांची नियुक्ती

प्रारंभ न्युज

बीड : शहरात घडलेल्या दगडफेक, जाळपोळ घटने नंतर तीन दिवसांनी जिल्ह्याची इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. नेट सुरु झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापार्यांचे व इतर रखडलेले व्यवहार सुरळीत झाले. यासह जाळपोळ, दगडफेकत ११ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेली जाळपोळची घटना अत्यंत भयंकर असून भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी पोलीस आता विशेष खबरदारी घेतील. जाळपोळीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 39 गुन्हे नोंद झाले असून 119 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. यासह ज्यांच्याकडे जाळपोळ, दगडफेक घटनेचे व्हिडिओ, फोटो, फुटेज असतील त्यांनी हे फोटो पोलीस प्रशासनाला द्यावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे. हे फोटो व्हिडिओ पाठवण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक व्हाट्सअप नंबर (9765151298) जारी केला आहे. फोटो, व्हिडिओ पाठवणाऱ्यांची नावे गुपित ठेवणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकरे यांनी सांगितले. यासह ज्यांचे दगडफेकेत नुकसान झालं आहे अशांनी सुद्धा संबंधित ठाण्यामध्ये तक्रारी द्याव्यात असे आवाहन सुद्धा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंतरवाली सराटी येथील आंदोलन काल (ता. ०२) राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर पर्यंत मागे घेतले. यामुळे जिल्हा प्रशासनाने टेन्शन दूर झाले आहे. तब्बल तीन दिवसानंतर आज बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना व इतर क्षेत्रांमध्ये विविध अडचणींचा सामना संबंधितांना करावा लागत होता. यासह दिपावली निमित्त ये—जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दुर होणार आहे. आज पासून बस सेवा सुरळीत सुरू झाल्यामुळे लालपरी परत रस्त्यावर दिसू लागली आहे. जिल्ह्यामध्ये जाळपोळ झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाने बळाचा वापर केल्यानंतर हाताबाहेर गेलेली परिस्थिती काही वेळातच आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळले. यासह सध्या जाळपोळ घटनेतील जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करण्याची मोहीम पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यातील दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. ज्या युवकांनी या आंदोलनामध्ये या जमावांमध्ये सहभागी होत तोडफोड केली, जाळपोळ केली त्यांचे आयुष्य मात्र बरबाद होणार आहे.

जाळपोळ, दगडफेकचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे दिल्यामुळे तपासाला येणार गती!

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या जाळपोळ, दगडफेकच्या घटना घडल्या. यामध्ये राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस, आ. संदीप क्षीरसागर यांचे घर, कुंडलिक खांडे यांचे ऑफिस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे ऑफिस, बीआरएसचे दिलीप गोरे यांचे ऑफिस, धैर्यशील सोळंके यांचे घर यासह इतर ठिकाणी जाळपोळ करत दगडफेक करण्यात आली होती. याच प्रकरणाचा तपास आता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे दिला आहे. शहरातील जाळपोळ व दगडफेकचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे दिल्यामुळे या तपासाला आता गती मिळणार असून जे दोषी आहेत, त्यांच्यावर मात्र योग्य ती कारवाई होईल. यासह पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख केतन राठोड हे अधिकारी पंकज कुमावत यांना मदत करणार आहेत,

पोलीस अधीक्षकांनी जाळपोळ, दगडफेक झालेल्या ठिकाणांना दिली भेट

बीड शहरामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी ज्या ज्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळच्या घटना घडल्या, त्या ठिकाणी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला. यामध्ये आ. संदीप क्षीरसागर यांचा बंगला, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे ऑफिस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे ऑफिस, बीआरएसचे दिलीप गोरे यांचे ऑफिस, धैर्यशील सोळुंके यांचा बंगला, जालना रोड, सुभाष रोड, राष्ट्रवादी भवन यासह इतर ठिकाणी भेटी देत पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या घटनेचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

खालील नंबर वर तुमच्याकडे उपलब्ध असलेले फुटेज व्हिडिओ फोटो पाठवण्याची पोलीस प्रशासनाचे आवाहन

बीड शहरामध्ये झालेल्या जाळपोळ, दगडफेक मध्ये कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच अनुषंगाने आता पोलीस प्रशासनाने एक व्हाट्सअप नंबर जारी केला असून या व्हाट्सअप ( 9765151298) नंबर वर ज्यांच्याकडे जाळपोळ दगडफेक चे व्हिडिओ फुटेज, फोटो असतील त्यांनी या नंबर वर ते व्हिडिओ फोटो, फुटेज पाठवावेत असे आव्हान स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी फोटो, फुटेज, व्हिडिओ पाठवले आहेत. त्यांची नावे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुपित ठेवण्याचे ठेवण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांनी न भिता उपलब्ध असलेले फोटो, फुटेज, व्हिडिओ पाठवावेत असे आव्हान सुद्धा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.

Previous Post

22 लाखाहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी – मराठा 3993 नोंदी आढळल्या!

Next Post

Beed : कुणबी, मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
Beed : कुणबी, मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू

Beed : कुणबी, मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू

आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांसोबत- आ.संदीप क्षीरसागर

आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांसोबत- आ.संदीप क्षीरसागर

बीड मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

बीड मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा