बीड । पोलीस स्मृती दिन निमित्त 21 ऑक्टोबर रोजी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातकर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या 188 हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रधान न्यायाधीश न्या. आनंद यावलकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रधान न्यायाधिश, यावलकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक श्वेता खाडे यांनी सर्वांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर अधिकारी यांनीही शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी हुतात्मा स्मृति परेडचे संचलन जिल्हा राखीव पोलीस निरीक्षक पी.पी. दलाई यांनी केले.
———-