मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री देण्यात येऊ नये, यासाठी येथीलच आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारसी केल्या होत्या. परंतु अजित दादाचं वजन वाढल्यामुळे आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिंदे — फडणवीस सरकार मध्ये एकाच मंञ्यांकडे चार-पाच जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. परंतु शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर आमच्या मंत्र्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात यावे, यासाठी अजितदादांनी आग्रह धरला होता. यामध्ये तिन्हीही नेत्यांमध्ये समझोता झाल्यानंतर आज अखेर राज्यातील 12 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. यात पुणे- अजित पवार, अकोला— राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील, अमरावती- चंद्रकांत दादा पाटील, भंडारा- विजयकुमार गावित, बुलढाणा— दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम, बीड- धनंजय मुंडे, परभणी- संजय बनसोडे, नंदूरबार- अनिल भा. पाटील, वर्धा – सुधीर मुनगंटीवार अशी जबाबदारी संबंधित नेत्यांवर देण्यात आले आहे.