गेवराई प्रतिनिधी – अंतरवली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ गेवराई येथील वकील संघाने दि. ११ रोजी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले
निवेदनात म्हंटले आहे की, आंदोलकावर झालेल्या लाठीमार निषेध करण्यात येत आहे. अंतरवली सराटी येथे आंदोलनास बसलेल्या उपोषणक त्यांची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी
यावेळी वकील संघाच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर गेवराई वकील संघाचा जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अमित मुळे, सचिव अॅड. प्रदिप मडके यांची स्वाक्षरी आहे. या आंदोलनात वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.