बीड प्रतिनिधी :- खा.शरदचंद्र पवार यांच्या १७ ऑगस्ट रोजीच्या सभेसाठी आ.क्षीरसागरांनी पूर्वतयारी बैठका सुरू केल्या आहेत. मंगळवार (दि.८) रोजी पिंपळनेर, ताडसोन्ना, नाळवंडी, ढेकणमोहा, राजुरी घोडा पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांची सभा १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे असल्याने सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातून सभेच्या नियोजनाला सुरूवात केली आहे. आ.क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.८) रोजी पिंपळनेर, ताडसोन्ना, नाळवंडी, ढेकणमोहा, राजुरी घोडा पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.