Beed : पाटोदा-मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील या दौऱ्यामध्ये त्यांच्या स्वागताचे संपूर्ण नियोजन करण्यात वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मागच्या काही दिवसांपासून त्यांनी या स्वागत सोहळ्यासाठी मेहनत घेतली होती. या दौऱ्यात पाटोदा शहरात बांगर कुटुंबाने मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वतःच्या निवासस्थानी मोठ्या अगत्याने स्वागत केले. तर बाळा बांगर यांच्या नियोजनातून
सौताडा ते लिंबागणेशदरम्यान तब्बल ११ ठिकाणी धनंजय मुंडे यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले.
पाटोदा शहरात प्रवेश करतानाच चुंबळी फाटा येथे स्वतः बाळा बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत केले.त्यानंतर पाटोद्याच्या शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून पुषवृष्टी करण्यात आली.त्यानंतर लिंबागणेशपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडेंचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी ठिकठिकाणी धनंजय मुंडे ‘आगे बडो’ च्या घोषणांनी परिसर निनादला होता. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी बांगर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याठिकाणी रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर , बाळा बांगर आदींनी धनंजय मुंडे यांचे कौटुंबिक वातावरणात स्वागत केले. त्यानंतर बांगर कुटुंबियांच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या ताफ्याला पाटोद्यामधून सुमारे १०० वाहने जोडली गेली. बाळा बांगर यांच्या नियोजनातून ठिकठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि बाळा बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांचे स्वागत केले.