बीड प्रतिनिधी – देशभरातील सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे जाणते राजे खा.शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्यासारख्या लढाऊ नेत्यांना महाराष्ट्रत जिवे मारण्याच्या धमक्या सातत्याने फोनवरून फेसबुक वरून येणार्या धमक्यांच्या निषेध नोंदवण्यासाठी आज (दि.१२) रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते खा.संजयजी राऊत साहेब यांना आलेल्या धमक्यांच्या निषेधार्थ उद्या बीड येथे आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड व शिरूर (का.) तालुका राष्ट्रवादी-कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आज (दि.१२) रोजी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, लोकशाही मार्गाने मूक मोर्चा निघणार आहे. असे राष्ट्रवादी-कॉंग्रेस पार्टी, बीड व शिरूर (का.) तालुका यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.