–पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली भेट
–चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी केली विशेष पथकांची नियुक्ती
–सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआरही चोरट्यांनी चोरुन नेला
–आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे तपास; चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास गतिमान
–बँक मॅनेजरच्या म्हणण्यानुसार साडे बारा लाख रुपये व काही सोने चोरीस
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : तालुक्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या मागच्या बाजूची खिडकी चोरट्यांनी गॅस कटरने कट करुन बँकेत प्रवेश करत बँकेतील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज (ता. 11) सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, आयपीएस पंकज कुमावत यांनी घटना स्थळी भेट दिली. यावेळी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा हे सुद्धा उपस्थित होते. गेल्या काही दिवसापासून नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून आज तर चक्क बँकेत धाडसी दरोडा टाकल्यामुळे या परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संपुर्ण पोलीस यंत्रणा हालवत चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केली आहेत.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश बसस्थानक जवळ असणाऱ्या महाराष्ट्र ग्रामिण बँकेत शनिवारी (ता. 10) मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरटे बँकेच्या मागच्या बाजूची खिडकी गॅस कटने कट करत, शिडीने वर चढून बँकेत गेले. यावेळी त्यांनी बँकेतील तिजोरी सुद्धा गॅस कटरने कट करत, तिजोरीत ठेवलेले दागिणे, रोख रक्कम असा एकूण साडे बारा लाखाचा मुद्देमाल मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी भेट दिली. यासह आयपीएस पंकज कुमावत यांनी सुद्धा याठिकाणी भेट दिली. बँक मनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडे बारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे. बँकेत दरोडा टाकल्यानंतर मात्र येथील परिसरातील नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासर्व बाबींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तात्काळ यंत्रणा हालवत चोरट्यांच्या शोध मोहिमेसाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.