राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : केज बाजार समितीवर 14 जागांवर विजय मिळवत केज मतदार संघाचे आमदार नमिता मुंदडा यांनी वर्चस्व मिळवला आहे तर दुसरीकडे 2019 मध्ये खासदारकीची राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना मात्र चारच जागांवर समाधान मानावे लागले आहे.बजरंग सोनवणेंसाठी शेतकरी पुत्र म्हणून हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांच्यासाठी हा विजय 2024 मध्ये लाभदायक ठरणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत आहे. या विजयात रमेश आडसकरांचा सुद्धा मोठा वाटा आहे.