बीड : तालुक्यातील मौजे.अंजनवती येथील येडे वस्ती स्थित श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात मध्यरात्री २-३ सुमारास अज्ञात चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला, प्रतिकार करणा-या दोन महिलांना मारहाण केली.त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेकनुर पोलिस प्रशासन घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखा व श्वानपथक यांनी पाहणी केली असुन पुढील तपास नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय शेख मुस्तफा करत आहेत.
दोन महिलांना चोरट्यांकडून मारहाण
झोपलेले पुजारी कृष्णा जोशी यांच्या रूमला बाहेरून कडी लावली त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांच्या पत्नी गीता जोशी वय ४५ वर्ष यांच्या डोक्यात मारहाण केली, डोळ्याखाली जखम असुन
सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मारहाण केली त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिड तोळे सोने व काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
नेकनुर पोलिस प्रशासन ठाण मांडून, स्थानिक गुन्हे शाखा तसेच श्वानपथक हजर
नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय शेख मुस्तफा, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, हवालदार राख तसेच लिंबागणेश पोलिस चौकीचे .नागरगोजे, हवालदार सचिन डिडुळ घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय दुलत व त्यांची टीम तसेच श्वानपथक दाखल झाले असून पुढील तपास शेख मुस्तफा करत आहेत.