• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home महाराष्ट्र

पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन

Prarambh Team by Prarambh Team
March 14, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पुणे, दि. १३: पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प असून त्यासाठी सर्वांना बरोबर घेत शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आणि लसीकरणाचा प्रयत्न केला. दोन वर्षात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पार्क नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या प्रकल्पाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पार्क उपयुक्त ठरणार

श्री. पवार पुढे म्हणाले, या प्रकल्पावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरावा अशी याची रचना असणार आहे. त्यात ओपन थिएटर, जिम, मुलांसाठी अभ्यासिका, सायकल ट्रॅक, बालकांसाठी खेळाची जागा आदी अनेक सुविधा परदेशातील सुविधांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. कडुनिंब, अशोका आदी झाडांसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने घोषित केलेली सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे या पार्कमध्ये लावण्यात येणार आहेत. या पार्कसोबत विविध प्रकारची झाडे लावून टेकड्या हिरव्यागार करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाला गती

पुढील ३ वर्षात राज्यात सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुण्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार सुविधा असलेली देशातील पहिली मोठी ‘मेडिसिटी’ वसाहत उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे मेट्रोसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रिंग रोडच्या भूमी संपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीं आहे. पुणे- नाशिक सेमी- हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर १६ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे . मेट्रोची कामे करताना नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

रोजगारनिर्मितीवर शासनाचा भर

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. व्यवसाय पडला. त्यामुळे मनुष्यबळाला मदत करण्याची, युवकांसाठी इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना आकर्षित करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे.

विकासासाठी सर्वांना सोबत घेणार

पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यात आणि राज्यात शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून सर्व जाती धर्माला बरोबर विकास साधायचा आहे अशी शासनाची भूमिका आहे.

नागरिकांनी कार्यक्रमांना स्वागतावर खर्च करण्याऐवजी वृक्षारोपण किंवा शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्त्वाचे-कु.तटकरे

कु.तटकरे म्हणाल्या, परिसराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसोबत ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्वाचे आहेत. या प्रकल्पासाठी प्रादेशिक पर्यटन प्रकल्पातून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणखी ५ कोटींचा निधी पुढील टप्प्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण प्रकल्प १२ कोटी ५० लक्ष रुपयांचा आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशी चांगली कामे करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले.

सुनील टिंगरे म्हणाले, या परिसरात एक चांगल्या उद्यानाची गरज होती. आता ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असून त्याचा परिसरातील लहानथोरांना लाभ होणार आहे.

विविध विकासकामांचे भूमिपूजन

आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले.पुणे पंचशील चौक, ताडीवाला रोड येथे नूतनीकृत शिल्पाचे उद्घाटन, फुलेनगर- नागपूर चाळ येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन, धानोरी जकात नाका येथे राजयोग मेडिटेशन सेंटर, अग्निशामक केंद्र, माजी सैनिक सांस्कृतिक भवन तसेच उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रामभाऊ मोझे, कमलताई ढोले पाटील, नगरसेवक प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड, नगरसेविका शीतल सावंत, रेखाताई टिंगरे, उषाताई कळमकर आदी उपस्थित होते.





Previous Post

हे पहा राज्य सरकार कशी लुट करत आहे…

Next Post

बीड जिल्हा विकासाचा नवीन पॅटर्न देशात नावाजला जाईल, विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 29, 2025
आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

November 6, 2024
Beed : बीड पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश

Beed : बीड पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश

September 20, 2024
आ. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील बैठकांमधून वाढवले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल

आ. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील बैठकांमधून वाढवले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल

September 4, 2024
पंकजाताई मुंडेंविरोधात ‘फेक नरेटीव्ह’ सेट करण्याचा कांही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजाताई मुंडे यांचा इशारा

पंकजाताई मुंडेंविरोधात ‘फेक नरेटीव्ह’ सेट करण्याचा कांही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजाताई मुंडे यांचा इशारा

July 15, 2024
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

December 19, 2023
छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग,धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग,धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

September 16, 2023
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

September 14, 2023
परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात, कॅबिनेट बैठक सोडून धनंजय मुंडे रुग्णालयात आले धावून

परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात, कॅबिनेट बैठक सोडून धनंजय मुंडे रुग्णालयात आले धावून

September 6, 2023
Next Post
बीड जिल्हा विकासाचा नवीन पॅटर्न देशात नावाजला जाईल, विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्हा विकासाचा नवीन पॅटर्न देशात नावाजला जाईल, विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे - पालकमंत्री धनंजय मुंडे

बीडकरांना वेठीस धरणाऱ्या सहा जणांचे निलंबन

बीडकरांना वेठीस धरणाऱ्या सहा जणांचे निलंबन

फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक करु नका —धनंजय मुंडे

फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक करु नका —धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा