सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 24,19,907 पोहचली.
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत 75,684 इतकी घट
दैनंदिन रुग्णसंख्या 2.11 लाख असून, नवे रुग्ण कमी होण्याचा कल कायम
देशात आतापर्यंत एकूण 2,46,33,951 जण बरे झाले; गेल्या 24 तासात 2,83,135 जण बरे झाले
सलग 14 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
बरे होण्याचा दर वाढून 90.01% वर पोहचला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 10.93%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 9.79% असून सलग तिसऱ्या दिवशी तो 10% पेक्षा कमी
देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 20.27 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या
लसींच्या 20 कोटी मात्रा देणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे
चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते असून गेल्या 24 तासात 21.57 लाख चाचण्या करण्यात आल्या