आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन
६ तारखेस फॉर्म भरणे, ७ आणि ८ तारखेला मुलाखती
बीड प्रतिनिधी:- नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दि.६ नोव्हेंबर रोजी, इच्छुक उमेदवारी अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती ७ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी भवन, बीड यथे होणार आहेत.
२०२२ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आलेल्या बीड नगरपरिषदेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.१० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आणि लगेचच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीड शहरातील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज आणि मुलाखतीचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. त्यामुळे बीड शहरातील उमेदवारांनी पक्षाकडून विहित केलेले शुल्क भरून अर्ज घेण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे. दरम्यान विहित मुदतीच्या नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
चौकट (हायलाईट करावी)
*असे आहे इच्छुक उमेदवारांसाठी पक्षाकडील वेळापत्रक*
दि. ६ नोव्हेंबर २०२५ – राष्ट्रवादी भवन, बीड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आपला इच्छूक उमेदवारी अर्ज भरून जमा करणे.
– दि. ७ नोव्हेंबर – प्रभाग क्रमांक. २,३,४,५,६,७,१९,२०,२१,२२,२३,२४,२६ या प्रभागांतून नगरसेवक उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
– दि. ८ नोव्हेंबर – प्रभाग क्रमांक. १,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,२५ या प्रभागांतून नगरसेवक उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
– ७ नोव्हेंबर व ८ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होतील.

















