भाजपाचे माजी पं.स.सदस्य अनिल पवळ यांच्यासह समर्थकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश
गेवराई प्रतिनिधी : शासकीय योजनेतुन वैयक्तीक लाभ देतांना कधीच पक्ष, जात, धर्म याचा विचार केला नाही, सत्तेचा उपयोग सदैव दर्जेदार विकास कामांसाठीच होईल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. माजी पं.स.सदस्य अनिल पवळ यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी ते बोलत होते. या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे अमरसिंह पंडित यांनी आमचे कुटूंब एकत्रित आणले अशी भावना अनिल पवळ यांचे बंधु सुभाष पवळ यांनी व्यक्त केली. तुम्ही सत्तेसाठी पक्ष सोडला आम्ही स्वाभिमाना साठी राष्ट्रवादीत आलो अशी खोचक टिका सरपंच कालिदास नवले यांनी केली. गेवराई येथील कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीचे कोळगांव गणातील माजी पं.स.सदस्य अनिल पवळ, सिरसमार्गचे सरपंच सुरेश मार्कड, ग्रा.पं.सदस्य महारुद्र वखरे, गोकुळ जाधव, विश्वांभर रडे, भगवान सागडे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. कार्यक्रमाला सिरसमार्ग पंचक्रोशितील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुभाष पवळ, भारत तांबारे, प्रल्हाद करांडे, मोहनराव पवळ, सोमेश्वर गचांडे आणि कालिदास नवले आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणुन काम करतांना सुमारे बारा वर्षापुर्वी सिरसमार्ग येथील बॅरेजचे काम आपण पुर्ण केले, त्यानंतर दहा वर्षात बॅरेज जवळील पुल व इतर कामे झाले नाहीत. सिरसमार्ग पंचक्रोशित विकास कामे करण्यासाठी मोठा वाव आहे मात्र मध्यंतरीच्या काळातील निष्क्रीयतेमुळे ही कामे थांबली. टाकळगव्हाण रस्ता, दिमाखवाडी कडे जाणारा पुल, स्मशानभुमी, नविन ट्रान्सफार्मर, दत्त मंदिरा समोरील सभामंडप यासह ग्रामस्थांनी मागणी केलेली सर्व कामे येणार्या काळात पुर्ण होतील. सत्तेचा उपयोग विकासासाठीच होत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करुन अनिल पवळ यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्र्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत केले.
जयभवानीचे माजी चेअरमन स्व. सुंदरराव पवळ यांच्या परिवाराला पुन्हा एकदा एकत्रित आणण्याचे काम आजच्या प्रवेशामुळे झाले असुन हा परिवार निष्ठेने तुमच्या पाठिशी उभा राहिल असा विश्वास सुभाषराव पवळ यांची आपल्या भाषणात व्यक्त केला. आम्ही पक्ष सोडला म्हणुन आम्हाला गद्दार म्हणणार्यांनी आता स्वत:च्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी पक्ष सोडला, आता यांना काय म्हणायचे ? शिवछत्र परिवाराला कधीही जात-पात शिवली नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला येथे सन्मानाची वागणुक मिळते, म्हणुनच आम्ही स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी झटणारा शिवछत्र परिवार असल्यामुळे आम्ही या परिवारात सामिल झालो आहोत. येणार्या निवडणुकीत प्रत्येक जागेवर अमरसिंह पंडित उमेदवार म्हणुन उभे आहेत असे समजुन कामाला लागवे असे आवाहन गेवराई तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले यांनी केले.
यावेळी पृथ्वीराज पवळ, दत्तात्रय तांबारे, सखाराम तांबारे, मुजीब शेख, नाथ राजळकर, बाळासाहेब राजळकर, ज्ञानेश्वर वाघमोडे, सुरज राजळकर, अभिमान राजळकर, रामा सागडे, राजेंद्र पवळ, बाळासाहेब कोळेकर, सत्यवान रडे, मच्छिंद्र कोळेकर, अर्जुन वखरे, संजय रडे, दत्ता रडे, संतोष थोरात, भिमराव राजळकर, सचिन भागवत रडे, अशोक पवार , सुंदर मार्कड, यादव कारंडे, संतोष थोरात, अशोक कारंडे, रामकिसन कारंडे, अर्जुन पवळ, परमेश्वर जाधव, बंडु जाधव, प्रदिप कांगडे, केशव जाधव, आविनाश आरेकर, पांडुरंग टाकसाळ, कृष्णा शेजाळ, किशोर रडे, शहादेव खोड, शहादेव घुगे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला.
यावेळी जयभवानीचे माजी व्हा.चेअरमन आप्पासाहेब औटी, विठ्ठलराव शेळके, पांडुरंग गाडे, कुमारराव ढाकणे, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी सभापती मुजीब पठाण, पांडुरंग कोळेकर, जगन्नाथ शिंदे, सुभाषराव पवळ, किशोर कांडेकर, कालिदास नवले, जालिंदर पिसाळ, मदनराव घाडगे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जयदिप औटी, राजाभाऊ वारंग, बळीराम रसाळ, विकास सानप, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, शेख खाजाभाई, दादासाहेब घोडके, उपसभापती श्रीहरी पवार आदींसह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

















