तेलगाव नाका येथे पाण्याची नविन पाईपलाईन योजनेचा शुभारंभ
शाहूनगर येथील रस्ता कामासह विविध ठिकाणच्या विकास कामांची केली पाहणी
बीड प्रतिनिधी : बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदार संघातील विकास कामांचा समतोल कायम ठेवला आहे मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात सुरू झालेली विकासकामे गतीने पुढे सरकावीत यासाठी स्वतः उभा राहून आमदार संदीप भैया लक्ष देत आहेत. शनिवारी (दि.८) सकाळी बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात बंधारा कम पुल होत असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली. तसेच तेलगाव नाका येथे पाण्याच्या नविन पाईपलाईन योजनेचा शुभारंभ आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात बंधारा कम पुल होत आहे.या जागेची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणी करण्यात आली. लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरूवात देखील होणार आहे. काम सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी व चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
बीड शहरातील तेलगाव नाका येथे पाण्याची नविन पाईपलाईन योजनेचा शुभारंभ आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसरात सूरु असलेल्या रस्ता कामांची पाहणी केली. याबरोबरच बीड शहरातील प्रभाग क्र.२२ मधील कै.शिवाजी धांडे नगर भागातील मुख्य नाल्याची पाहणी करून नाल्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत आ.संदीप भैय्यानी संबंधित यंत्रणेस निर्देश दिले. तसेच या परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी देखील केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
सध्या बीड शहरातील शाहूनगरमधील आदर्श नगर भागात सिमेंट रस्ता कामासह विकासकामांची पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर आ.संदीप क्षीरसागर यांनी चर्चा केली. बीड शहरासह मतदारसंघातील विकास कामांचा वेग यापुढेही असाच कायम ठेवला जाईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.