• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 8, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

Prarambh Team by Prarambh Team
January 13, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
खा.बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप

बीड: ९ डिसेंबरला मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणातून हत्या झाली. यानंतर ११ डिसेंबर या तारखेला या हत्येशी संबधित असलेल्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर दि.१२ डिसेंबर रोजी माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आरोपी निघून गेला, असा खळबळजनक आरोप खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपाने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दि.१३ डिसेंबर रोजी केज येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते. त्याआधी खा.सोनवणे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटूंबियांच्या आंदोलनास भेट दिली होती. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख, दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, दि.२८ मे रोजी या खंडणीच्या प्रकरणाला सुरूवात झाली. यानंतर २९ नोव्हेंबरला पुन्हा खंडणी मागितली. पुढे दि.६ डिसेंबर रोजी खंडणीसाठी अवादा कंपनीच्या परिसरात वाद झाला. याच वादाचा राग मनात धरून दि.९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण  खून करण्यात आला. यानंतर दि.११ डिसेंबर रोजी खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो. पुढे दि.१२ डिसेंबर रोजी हाच आरोपी माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो आणि तिथून निघून जातो. इतकी दहशत पोलीस प्रशासनावर होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मी पहिल्याच बाईटमध्ये मीडियाला म्हटलं होतं की, तिसऱ्या आरोपींचे कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागतंय का बघा?, कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होतं. पुढे हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचं सापडलं. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो. खंडणीच्या आरोपीवर ११ तारखेला गुन्हा दाखल झाला. मात्र, १२ तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी अन् पोलीस अधिकारी यांची भेट झाली. हे खात्रीने सांगत आहे. म्हणजे, पोलिसाला तिथं मध्ये बसवून तो आरोपी निघून गेला का? असा सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला. याच बरोबर वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे, तो कुठल्या पदावर आहे हे मला माहिती नाही. पण, त्यांनाही पोलीस गार्ड आहेत, हे गार्ड आरोपीसोबत कसे काय? आणि आरोपी पळून जाताना पोलिस गार्ड काय करीत होते ? असे सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले. ११ डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली. ३१ डिसेंबरला अटक होईपर्यंत २१ दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सह-आरोपी का केलं जात नाही, असेही खा.सोनवणेंनी म्हटलं आहे.

००

मुख्यमंत्र्यांना भेटूनही एसआयटीचे अधिकारी तेच

संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना पोलीस प्रशासनावर भरवसा राहिलेला नाही. त्यांनी एसआटीमध्ये आरोपींच्या मनावर अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांना वाटत असावे, यामुळे एसआयटीतील अधिकारी बदलावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे भेटून केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण द्याल ती नावाचे अधिकारी देतो, असे म्हटले होते. परंतु अद्याप ते अधिकारी बदलले नाहीत, असेही खा.सोनवणे यांनी म्हटले.

त्यांची नावे जाहिर करा

खंडणी आणि खून हे प्रकरण एकमेकांशी संबधित आहेत. या प्रकरणात खंडणीतील आरोपींशी ज्यांचे संबंध आहेत, अशा अनेकांना एसआयटीने चौकशीसाठी बोलविले होते. त्या सर्वांची नावे जाहिर करण्यात यावीत. त्या लोकांचे आरोपींशी काय संबंध आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. याच बरोबर खून आणि खंडणीतील आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावे, असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.

Previous Post

रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाबाबत खा.सोनवणेंनी घेतली चार तास बैठक

Next Post

माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचे आंदोलन सुरू

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचे आंदोलन सुरू

माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचे आंदोलन सुरू

सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही नगर परिषदेच्या आढावा बैठकीत आ.विजयसिंह पंडित यांचा इशारा

सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही नगर परिषदेच्या आढावा बैठकीत आ.विजयसिंह पंडित यांचा इशारा

राखेच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालावा – मंत्री पंकजा मुंडे

राखेच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालावा - मंत्री पंकजा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा