• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, August 10, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

गेवराई दहशतमुक्त अन प्रस्थापितांच्या जोखडातून सोडविण्यासाठी साथ द्या!

Prarambh Team by Prarambh Team
November 17, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पुजाताई मोरे यांचे मतदारांना आवाहन

गेवराई  : गेवराई तालुका पवार, पंडित यांच्या प्रचंड दहशतीखाली आहे. मनात असूनही लोक बोलायला तयार नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र तालुका 60 वर्षांपासून हुकूमशाहीतच आहे. यामुळे गेवराई तालुका दहशतमुक्त करायचाय, त्याला प्रस्तापितांच्या जोखडातून मुक्त करायचे आहे, यासाठी मला साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार पुजाताई मोरे यांनी धोंडराई येथील आयोजित कॉर्नर सभेत ग्रामस्ताना केले.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान होत आहे. गेवराई विधानसभेच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार पूजाताई मोरे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावाला भेटी देत प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. पूजाताई मोरे यांना ग्रामीण भागातून भेटणारा पाठिंबा आणि प्रोत्साहन पाहता प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. 16 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील धोंडराई येथे पूजाताई मोरे यांची प्रचार सभा झाली. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पूजाताई मोरे यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे आणि सहकार्‍यांची उपस्थिती होती. या सभेत पूजाताई मोरे यांनी अत्यंत आक्रमक भाषण करीत तालुक्याची परिस्थिती ग्रामस्थांना समजावून सांगितली. पूजाताई मोरे म्हणाल्या की, मी शेतकरी संघटनेतून पुढे आली असून, मी टोकाचा संघर्ष केलेला आहे. शेतकरी कष्टकरी यांच्या हक्कासाठी मी लढा दिला आहे. तुमचा आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी मी लढत असून, गेवराई तालुक्याचे आणि तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गेवराई तालुक्यामध्ये प्रस्थापित घराण्याची मोठी दहशत आहे. मी अनेक ठिकाणी प्रचाराला गेले असता तालुक्याचा अभ्यास मला झाला असून, लोक उघडपणे बोलत नाहीत. संपूर्ण तालुका दहशतीखाली असून, देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली तरी गेवराई तालुका हुकूमशाहीत असल्यासारखे दिसते आहे. तालुक्याचे अनेक प्रश्न तसेच पडून आहेत. आमदाराचा मुलगा आमदार तर खासदाराचा मुलगा खासदार होतो आहे. शेतकर्‍यांच्या मुलांची लायकी असतानाही त्यांना संधी मिळत नाही. काही लोक केवळ आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदारकी मिळवायची असे म्हणतात. ज्यांना फक्त आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ते तालुक्याचा काय विकास करणार आहेत? असा सवाल पूजाताई मोरे यांनी ग्रामस्थांना केला.
त्या म्हणाल्या, आपला तालुका शेतकर्‍यांचा कष्टकर्‍याचा आहे, मात्र गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता भोगणारे आमदार याबाबत कधी सभागृहात बोलले आहेत का? त्यांना वाटते की मला यांनी पुन्हा निवडून द्यावे. ते आता सांगत सुटले आहेत की माझी ही शेवटची निवडणूक असून मला निवडून द्या, मात्र पुढच्या वेळी ते त्यांच्या मुलाला पुढे करतील आणि म्हणतील की ही माझ्या मुलाची पहिली निवडणूक आहे त्याला निवडून द्या. असेच गेल्या सात वर्षापासून तालुक्यामध्ये सगळे सुरू आहे. प्रस्थापितांनी या तालुक्यावर कब्जा केला आहे. शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांचे या प्रस्थापितांना काहीच देणे घेणे नाही. मी अनेक ठिकाणी गेले मात्र सामान्य लोक आणि व्यापारी सुद्धा दहशतीखाली बोलायला तयार नाहीत. लोकांच्या मनात असताना सुद्धा ते उघडपणे बोलू शकत नाहीत. एवढी दहशत तालुक्यासाठी घातक असून, ती उलथून टाकण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन पूजाताई मोरे यांनी केले.
त्या म्हणाल्या की, आम्ही शेतकर्‍यांच्या घरामध्ये जन्माला आलो हा आमचा दोष आहे का? या तालुक्याची परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन महत्त्वाचे आहे. दोन दिवसांपूर्वी असली राजे असलेले संभाजी राजे छत्रपती यांची आपल्या तालुक्यात सभा झाली. त्यावेळी या लोकांनी मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरविल्या. पूजाताई मोरे यांनी पैसे घेतल्या असल्याचा आरोप त्यांनी केला, त्यांचे काहीच वातावरण नसून त्यांना मत देऊन मत वाया घालू नका, असा प्रचार त्यांनी केला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यातूनच असे आरोप केले जात आहेत. मात्र मी शेतकर्‍याची मुलगी आहे, कोणासमोर झुकणार नाही. मला पैशाची गरज पडली तर माझ्या गरीब शेतकर्‍यांच्या समोर मी झोळी पसरेन मात्र स्वाभिमान विकणार नाही. मी चळवळीत वाढलेली आहे. चळवळीतील कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही, त्यासाठी अनेक वर्ष झगडावे लागतात. अशा कार्यकर्त्यांना डावलले तर तालुक्याचा विकास होणार नाही, यासाठी तुमच्या हातात असलेला अधिकार वापरा आणि तुमच्या लेकीला निवडून द्या, असे आवाहन पूजाताई मोरे यांनी यावेळी केले.

Previous Post

निवडणूक प्रचाराचा शेवटच्या टप्प्यातही सुरेश धस यांना सर्वाधिक प्रतिसाद

Next Post

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विजयसिंह पंडित यांना आमदार करा – खा. प्रवीण खंडेलवाल

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विजयसिंह पंडित यांना आमदार करा – खा. प्रवीण खंडेलवाल

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विजयसिंह पंडित यांना आमदार करा - खा. प्रवीण खंडेलवाल

मी समाजासाठी माझे कुंकू गमावले – डॉ.ज्योती मेटे

मी समाजासाठी माझे कुंकू गमावले - डॉ.ज्योती मेटे

बीडमध्ये शाहूनगर,बालेपीरच्या कॉर्नर बैठकीत दिसला आ.संदीपभैय्यांचा करिश्मा

बीडमध्ये शाहूनगर,बालेपीरच्या कॉर्नर बैठकीत दिसला आ.संदीपभैय्यांचा करिश्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा