• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, March 10, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आम्ही कायम व्यापारी, उद्योजकांचा सन्मान केला – मंञी उदय सामंत

Prarambh Team by Prarambh Team
November 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed : शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हटले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. आम्ही कायम व्यापारी, उद्योजकांचा सन्मान केला. बीडमधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी केले.

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील वैष्णव पॅलेस येथे शुक्रवारी (दि.१५) ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटनांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, विलास बडगे, लाडकी बहीण योजना समितीचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे, राणासिंग चव्हाण, राजेंद्र क्षीरसागर, भास्कर जाधव, नानासाहेब काकडे, बबनराव गोरे, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सुरवसे, सूरज चव्हाण, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, शहर व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना.उदय सामंत म्हणाले, माझे व डॉ.योगेश यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांची निवडणुकीतील घड्याळ ही निशाणी जरी चार नंबरवर असली तरी डॉ.योगेश क्षीरसागर हा उमेदवार एक नंबर आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने व्यापाऱ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. मी देखील व्यावसायिक आहे, आमचा पारंपारिक व्यवसाय ठेकेदारी आहे. ठेकेदारी करणे चूक नाही, ठेकेदारांकडून वसुली करणे चुकीचे, असाच प्रकार बीडमध्ये घडला आहे, असे म्हणत आ.संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. समोरचा उमेदवार नेमका कोणत्या पक्षात आहे? हे त्यालाच माहिती नसते. तो कधी म्हणतो शरद पवार, उध्दव ठाकरे तर कधी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेतो. आधी त्यांनी एकदा ठरवावे कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आहे. निवडून आल्यास दंड थोपटून, दादागिरी करून चालत नसते, असेही ते म्हणाले. क्षीरसागर कुटुंबाचे सर्व क्षेत्रात मोठे कार्य आहे. कुटुंबाचा नावलौकिक करण्याऐवजी इथल्या समोरच्या उमेदवाराने नाव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु जयदत्त क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर हे काम करत आहेत. ते विधिमंडळात माझ्यासोबत येणारच आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या वतीने मी बीडचे विकासाचे प्रश्न सोडवतो, असा शब्द देतो, मात्र तुम्ही बीडकर डॉ.योगेश यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. बीडमध्ये व्यापार पेठ, एमआयडीसी पाहिली, यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. तुमच्या प्रश्नांची मांडणी करत होते. अशी प्रश्नांची जाण असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा. यापूर्वी मी सुद्धा घड्याळाचा उमेदवार होतो. जेवताना, झोपताना, उठताना आपण घड्याळ पाहतो. त्यामुळे घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे, अगदी तसेच महत्त्व बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना आहे. बीड विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहीण योजनेचा लाभ ९८ हजार महिलांना मिळाला. त्यामुळे आपल्या उमेदवाराला ९८ हजारच्या पुढे मते मोजायची आहेत. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ना.उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
बीडच्या व्यवसायाला गती देणाऱ्या सुविधा
उपलब्ध करून देऊ : डॉ.योगेश क्षीरसागर

बीडच्या आमदाराने काहीच काम केले नाही म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची कायम उदासीनता राहिली. त्यांना व्यवसाय, उद्योग, एमआयडीसीसाठी विशेष काही करता आले नाही. या भागातील रस्ते होणे गरजेचे आहेत. एमआयडीसीतून नाळवंडीकडे जाणारा मुख्य रस्ता नवीन सरकार येताच करून घेतला जाईल. एमआयडीसीमध्ये रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव दिलेले आहेत. रिंग रोडचा प्रश्न सोडवायचा आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी विशेष लक्ष देईल. शहरातील व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

व्यापारी सुशिक्षित उमेदवाराच्या मागे : भास्कर जाधव

बीड शहर आणि मतदारसंघातील व्यापारी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील. नवीन सरकार महायुतीचे येईल, तेव्हा बीडमध्ये व्यापारी भवन उभारावे, एमआयडीसीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. व्यवसाय कर रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्या जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या.

Previous Post

बीड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – आ.संदीप क्षीरसागर

Next Post

महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा!

महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा!

निवडून द्या, महेबूब शेख पुढचे पाच वर्षे सेवक बनून काम करतील खा.सुप्रीया सुळे यांचे मतदारांना आश्वासन

निवडून द्या, महेबूब शेख पुढचे पाच वर्षे सेवक बनून काम करतील खा.सुप्रीया सुळे यांचे मतदारांना आश्वासन

डॉ. ज्योती मेटे यांच्या प्रचारार्थ नाळवंडी येथे भव्य सभा; सभेला प्रचंड गर्दी

डॉ. ज्योती मेटे यांच्या प्रचारार्थ नाळवंडी येथे भव्य सभा; सभेला प्रचंड गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा