सौ बिमारी का एकही ईलाज सुरेश धस
मी जे बोलतो ते डंके की चोट पे करून दाखवतो, फोकनाळ गप्पा मारत नाही — केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या पैठण पंढरपूर रस्त्याचा प्रश्न निवडणुकीनंतर मार्गी लावणार
—सुरेश धस
पाटोदयात ऐतिहासिक विक्रमी सभेने धसांच्या विजयावर शिक्कामोर्तब!
पाटोदा (प्रतिनिधी)
निवडणूक ही सुरेश धस यांच्या भविष्याची नसून जनतेच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे धस यांनी या मतदारसंघाला आपला परिवार म्हणून सेवा केली आहे चारा छावण्या उभारल्या गोरगरिबांच्या सुखदुःखाची कायम एकरूप राहून त्यांनी संबंध गोरगरिबांच्या कल्याणाचे आवाहन स्वीकारले आहे त्यामुळे त्यांना या निवडणुकीत जनतेनेच संधी दिल्यास आपले सर्व प्रश्न मार्गी लावतो.
मी जे बोलतो ते डंके की चोट पे करून दाखवतो, फोकनाळ गप्पा मारत नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले गडकरींच्या पाटोदा येथील विक्रमी सभेने सुरेश धस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र दिसले .
२३१-आष्टी, पाटोदा, शिरूर का. विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्षांचा अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.ना..नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा पाटोदा झाली.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री सुरेश आण्णा धस माजी आमदार साहेबराव दरेकर निरीक्षक माजी खासदार चंदुलाल साहू जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गडकरी यांनी आपले विकासाचे व्हिजन सांगत वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला.यावेळी त्यांनी सांगितले की,एक युवा नेता घटना हातात घेऊन फिरत आहे परंतु या नेत्याला इतिहास माहीत नाही अशी टीका यावेळी राहुल गांधी यांच्यावर त्यांनी नाव न घेता केली .स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजेत अटलजींनी त्यावेळी मला बोलावून सांगितलं होतं की गावांना रस्त्यांची जोडणी करणारी योजना तयार कर त्यानंतर तीन महिन्यात आपण अभ्यास करून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची निर्मिती केली. साडेसहा लाख देशातील गावांपैकी साडेतीन लाख गावांना जोडण्याचं काम हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं काँग्रेसने नेहमीच संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला. परंतु मी देखील कायद्याचा विद्यार्थी असून घटना व संविधान कोणीही व कधीही बदलवू शकत नाही. काँग्रेसने कधीही ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं नाही अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केली.
इंदिरा गांधींच्या काळातच काँग्रेसने खरंतर घटनेच्या धज्जीया या उडवल्या ते नेहमी खोटा प्रचार करतात मुस्लिम समाजाला खोटं सांगतात आमच्या सरकारच्या काळात असलेल्या 67 योजना या कोणत्याही जाती-धर्माला वगळून नसून सर्वांसाठी सारख्याच आहेत हे सर्वांना माहीत आहे मी जातिवाद मानत नाही माणूस गुणांनी मोठा होतो महापुरुषांची जात कधीही पाहिली जात नाही अस्पृश्यता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर समानता प्रस्थापित व्हावी हेच आमचे धोरण असल्याचे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.सरकारच्या २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणामुळे , ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत तुम्ही सुरेश भाऊ यांना विजयी करा असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेवटी म्हटले.
यावेळी माजीमंत्री सुरेश धस म्हणाले की,
गेल्या दहा वर्षात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे ३४ किलोमीटर पाटोदा तालुक्याच्या हद्दीतील पैठण-पंढरपूर पालखी मार्ग, १९ किलोमीटर बोगस पारगाव (ता.शिरूर का.) ते अणपटवाडी यांच्यासह मतदारसंघातील अनेक रस्ते प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित रस्त्यांच्या पूर्ततेबाबत आणि या भागात होणाऱ्या अनेक भविष्यात महामार्गाची मागणी करून पैठण पंढरपूर रस्त्याचा प्रश्न निवडणुकीनंतर मार्गी लावण्यात यावा अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे केली त्याचप्रमाणे मतदारसंघातील इतर चार रस्त्यांचे देखील प्रश्न मार्गी लावण्याची विनंती धस यांनी गडकरींना केली.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले,नितीन गडकरी यांनी त्यांच्या काळात चांगले कामे केली असून या निवडणुकीत सुरेश धस हे अडचणीत आल्याने मी गुरू या नात्याने त्यांच्या मदतीला आलो असून गुरू ने शिष्य अडचणीत असल्यावर मदतीला आले पाहिजे हेतूने मी त्यांना साथ देत असून सर्वांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे.
यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.खा.चंदुलालजी साहु साहेब,माजी आ. साहेबराव दरेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,विजय गोल्हार,श्याम धस,जयदत्त धस,सागर धस,तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले,गणेश शिंदे,तालुकाध्यक्ष भागवत येवले,नगराध्यक्ष जिया बेग,नगराध्यक्ष राजू जाधव,नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर,सभापती बद्रीनाथ जगताप,रंगनाथ धोंडे,महेंद्र गर्जे,मधुकर गर्जे,माऊली जरांगे,परमेश्वर येवले,सय्यद अब्दुला,सभापती रमजान तांबोळी,अरुण भैय्या निकाळजे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर फोरमचे यशवंत खंडागळे,बळीराम पोटे,भाऊसाहेब भवर,संजय आजबे,कल्याण पोकळे,लालासाहेब शिंदे,संतोष जाधव,शरद बामदळे,असिफ सौदागर,सुधीर घुमरे,अनिल ढोबळे,संजय ढोबळे,भारत मुरकुटे,सत्यसेन मिसाळ,प्रकाश खेडकर,सतीष जाधव,संजय नवले,विश्वनाथ घुले,जब्बार पठाण,अरुण भालेराव,हनुमंत काळे,महादेव जाधव,डॉ.नरेंद्र जावळे,आदम सय्यद,श्रीहरी गीते,रामेश्वर गोरे,राहुल चौरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना आरपीआय (आठवले गट ) आणि मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मतदारसंघातील मायबाप जनता प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होत
सुरेश धस हे जनतेच्या सुखदुःखाशी कायम एकरूप होणारे नेतृत्व
—केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भविष्यातील डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही सुरेश अण्णा यांना विजयी करा. सुरेश धस यांचे आष्टी मतदार संघामध्ये चांगले काम आहे. छावणी असेल दूध व्यवसाय असेल असे विविध अनेक लोकहिताचे कामे त्यांनी केलेले आहेत त्यामुळे त्यांना या निवडणुकीत तुम्ही विजयी करा नंतर माझ्याकडे दिल्लीला कामाची यादी घेऊन पाठवा मी ती सर्व कामे पूर्ण करून देईन असा मी तुम्हाला शब्द देत आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो हे तुम्हाला ज्ञात आहे.