Beed – काल रोजी जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आईन टप्प्यात स्वतःचा पुतण्या योगेश क्षीरसागर यास पाठिंबा देत त्यांना विधानसभा निवडणुकीत निवडून आणा असे आवाहन केले. बीड विधानसभा मतदार संघ हा आपल्या कुटूंबाच्याच ताब्यात राहिला पाहिजे असाच प्रयत्न जयदत्त क्षीरसागरांचा राहिला आहे. गत 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार होते. त्यावेळी अनिल जगताप यांनी त्यांचा प्रचार केला होता. खरं तर थोडी जरी त्यांना उपकारांची जाणीव असती तर त्यांनी अनिल जगतापांना पाठिंबा दिला असता परंतू आयुष्यभर त्यांनी बहुजनांचा द्वेषच केलेला आहे. जातीच्या पलिकडे त्यांची उडी जाऊच शकत नाही असे ते जातिवंत जातियवादी आहेत. चार वेळा बहुजनांनी जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभेत पाठविले याचा विसर त्यांना पडलेला दिसतोय. कुटूंबाच्या पलिकडे सत्ता जाता कामा नये हीच यांची प्रवृत्ती आहे. हाच अनुभव बीडकर पुन्हा एकदा घेत आहेत. यांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. असे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी म्हंटले आहे.