–बीड शिवसेना जिल्हा प्रमुखपद फायनल; घोषणा सामना वृत्तपत्रातुन होणार!
–युवा नेते परमेश्वर सातपुते, युवा नेते नितीन धांडे या दोघापैकी एकाचे नाव फायनल!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती मिळाल्यानंतर अनेकांनी या पदासाठी अतोनात प्रयत्न केले होते. तसेच मातोश्रीवरुन सुद्धा योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. या सर्व प्रक्रिये नंतर या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली असून ती व्यक्ती बीड मतदार संघातीलच असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच त्या व्यक्तीचे नाव घोषीत करण्यात येणार असून शिवसेनेच्या नियमाप्रमाणे त्या व्यक्तीच्या निवडीची घोषणा सामना वृत्तपत्रातुन करण्यात येते. नविन पदाधिकाऱ्यांचे नाव कोणाचे असेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते व शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे ही दोन नावे सध्या चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. कारण या दोघांचे काम सुद्धा तसेच आहे. पुर्वीपासून जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी यांनी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. यासह अवैद्य धंद्यात यांचा कुठेच संबंध नसल्यामुळे पक्ष यांनाच संधी देईल असे सुद्धा बोलले जात आहे.
परमेश्वर सातपुते…
किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी 2017 पासून किसान सेनेच्या जिल्हाप्रमख म्हणून कामास सुरुवात केलेली आहे. यादरम्यान त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. यासह त्यांनी पक्ष वाढीसाठी सुद्धा मोठे प्रयत्न केलेले आहेत. यासह सर्वांना सोबत घेऊन चलणारा नेते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते. यासर्व बाबीमुळे त्यांची जिल्हाप्रमख म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नितीन धांडे…
ज्यांनी जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण केले ते शिवसेनेचे माजी आमदार सुनिल धांडे, त्यांचेच पुतणे नितीन धांडे यांनी सुद्धा पक्ष वाढीसाठी मोठे काम जिल्ह्यात केलेले आहेत. गेल्या 20 वर्षापासून नितीन धांडे हे शिवसेनेत एकनिष्ठेने काम करत आहेत. आजपर्यंत जनहितासाठी केलेल्या आंदोलनामुळे नितीन धांडे यांच्यावर 29 गुन्हे नोंद झालेले आहे. यातुन त्यांची निर्दोष मुक्तता सुद्धा झाली आहे. सध्या ते शिवसेने जिल्हा संघटक पदावर काम करत असून कोरोनाच्या काळात त्यांनी खुप चांगले काम केलेले आहे. यासह सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते. वरील सर्व बाबीमुळे जिल्हा प्रमखपदावर त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.