बीड : शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा ” अभियान अंतर्गत बीड शहरामध्ये भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार,दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. शिवसंग्राम भवन,नगर रोड, बीड येथे रॅलीत सहभागी होण्याकरिता शहरातील सर्व देशप्रेमी, पत्रकार बांधव तथा बीडच्या नागरिकांना व सेवाभावी संस्थांनी शिवसंग्रामच्या व मा.आ.विनायकराव मेटे यांच्या वतीने बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे .
मा.आ.विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसंग्राम भवन येथे शनिवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बीड शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले गेले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 व्या वर्षात प्रथमच सर्वसामान्यांच्या घरावर तिरंगा फडकवणारा हा अमृत महोत्सव साजरा होत आहे . देशासाठी प्रेम , सद्भावना व्यक्त करण्याचा सुवर्ण अवसर या रॅलीच्या माध्यमातून आपणा सर्वांना उपलब्ध होत आहे म्हणून आपण सर्वांनी देशाप्रती व राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त करत या रॅलीत सहभाग नोंदवावा. या रॅलीमध्ये बीड शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवा – तरुण , देशप्रेमी सेवाभावी संस्था , पत्रकार बांधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत . या रॅलीचा प्रारंभ शिवसंग्राम भवन बीड येथून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – तुळजाई चौक – बार्शी नाका – नाळवंडी नाका -खंडेश्वरी देवी मंदिर – वैष्णव पॅलेस -मोंढा रोड -जालना रोड – अण्णाभाऊ साठे पुतळा -माळीवेस – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – कंकालेश्वर -जुना बाजार – बलभीम चौक – कारंजा रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे या भव्य रॅलीचा समारोप विविध प्रमुख पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तथा मा.आ.विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच शिवसंग्रामच्या वतीने सर्व विद्यार्थी, तरुण,व्यापारी, देशप्रेमी , पत्रकार बांधव या सर्वांना रॅलीत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे .