अंबाजोजाई तालुक्यातील बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न
धनंजय मुंडेंनी सामाजिक न्यायाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले – बाबुराव पोटभरे
अंबाजोगाई – आपण महापुरुषांची स्मारके उभारतो, त्यांना वंदन-अभिवादन करतो, जयंती-पुण्यतिथी साजरी करतो; पण एवढ्यावरच न थांबता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महामानवाची स्मारके ही त्यांच्या विचारांची प्रेरणास्थळे सिद्ध व्हावीत, असा प्रगल्भ विचार जोपासणे गरजेचे असल्याचे मत माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणी व सुशोभिकरण या स्मारक कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन संपन्न झाले. सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता. या कामाचे भुमीपूजन संपन्न होत असताना आपल्याला विशेष आंनद असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी बर्दापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. त्यानंतर या ठिकाणी नवीन स्मारक उभारण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली होती व आज ती घोषणा पूर्णत्वास गेल्याने गावचे सरपंच सुधाकर शिनगारे यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री. मुंडेंचे आभार मानले.
धनंजय मुंडे यांच्या सारखे कर्तबगार मंत्री सामाजिक न्याय खात्याला लाभल्या नंतर त्यांनी मागील काळात उत्तमरीत्या या विभागाची धुरा सांभाळली व या विभागाचा लौकिक वाढेल अशी कामगिरी केली. समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले धनंजय मुंडे व त्यांचे कार्य सदैव स्मरले जाईल, असे मत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास आ. संजय भाऊ दौंड, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद जगतकर, राजकिशोर मोदी, गोविंदराव देशमुख, दत्ताआबा पाटील, बबन भैय्या लोमटे, शिवाजीराव शिरसाट, शंकरअण्णा उबाळे, ताराचंद शिंदे, विलास काका सोनवणे, बाळासाहेब शेप, अनंतराव जगतकर, प्रा. एस. के. जोगदंड, लंकेश वेडे, महादेव आदमाने, बाळासाहेब गंगणे, प्रशांत जगताप, प्रमोद दासूद, तानाजी देशमुख, रंजीत लोमटे, सुभाष बनसोडे, उज्जैन बनसोडे, दत्ता सरवदे, अरुण बनसोडे, अंजलीताई पाटील, सुंदर जोगदंड , बाळासाहेब देशमुख, सुंदर जोगदंड, आबासाहेब पांडे, दत्ताभाऊ गंगणे, महेश जगताप, शरद गंगणे, वसंतराव कदम, वाहीद पठाण, रामलिंग चव्हाण, अजित गरड, प्रमोद भोसले, माऊली अवताडे, सतीश गंगणे, आयुबभाई शेख, श्रीराम वाघमारे, मनोज गंगणे, गणेश भगत, महादेव वाघमारे, गणपततात्या राऊत, सुंदर शिंदे, बंडू शिंदे, अख्तर जहागीरदार, महादेव नेवल, धर्मराज पाटील, नर्सिंग निकम, प्रदीप चव्हाण, विठ्ठल काकरे, जब्बार पटेल, मोतीराम शेवाळे, बबनराव मुंडे, प्रकाश चाटे, रामभाऊ बडे, अशोक चाटे, खिलाफत भाई, सुधाकर शिंगारे, विलासबापू मोरे, बबलू शेख, विश्वनाथ जानकर, मुक्तार देशमुख, विनोद गंडले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सेवा सोसायटीचे सदस्य त्याचबरोबर राजेभाऊ गंडले, चंद्रकांत गंडले, नामदेव ढोबळे, सूर्यकांत गंडले, बालासाहेब गंडले, रवींद्र गंडले, राजरतन गंडले, बाबासाहेब गायकवाड, शिवाजी गंडले, सुनील गंडले, संभाजी कोरडे, दिलीप कोरडे, युवराज ढोबळे, अजय कांबळे, गौतम सरवदे, राहुल गंडले, अक्षय गंडले, देवानंद ढोबळे, रोहन गंडले, महादेव गंडले, मारुती गंडले, धर्माजी गंडले यांसह आदी उपस्थित होते.