गाटी भेटी व संवाद बैठकांवर भर ..!
बीड : Beed लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड विधानसभा मतदार संघात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावखेड्यापर्यंत प्रचाराचे काम जोमाने चालू आहे. रोज ग्रामीण भागात थेट मतदारांशी संवाद साधण्याचे काम राजेंद्र मस्के यांच्या मार्फत सुरु आहे. ग्रामीण भागातील संवाद बैठकांना उत्स्फुर्तपणे प्रतिदास मिळाला. काल केतुरा, खापरपांगरी, तांदळवाडी भिल्ल, पिंपळवाडी आदि गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून मतदानाचे आव्हान केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, बाप्पा मस्के, युवराज मस्के, बालाजी पवार, कल्याण पवार, बद्रिनाथ जटाळ, विशाल खाडे, सचिन तिपटे, अमर सानप सह आदी उपस्थित होते.
संवाद बैठ्कीदरम्यान ग्रामस्थांशी मोकळे पणाने चर्चा करत असताना रस्ते, पाणी या समस्ये बरोबरच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. गरीब मराठा समजला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका योग्यच आहे. परंतु एवढे वर्ष कुणबी नोंदी दाबून ठेवण्याचे पाप कॉंग्रेस व विरोधी पक्षाने केले. अशा पक्षाला समाजाने तडीपार केले पाहिजे. त्यांच्या भूमिकेमुळे मराठा बेकार तरुणांचे नुकसान झाले. अनेक तरुण उच्च शिक्षणापासून दूर राहिले. हे काम आरक्षण विरोधी नेत्यांनी केले. मराठा आरक्षणा बाबत भाजपाची सकारात्मक भूमिका असल्याने शिंदे- फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या ओबीसी नोंदीचे पुरावे शोधण्याचे आदेश दिले. यामुळे 54 लाखापेक्षा अधिक नोंदी सापडल्या. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. दिलेले आरक्षण टिकवण्याची हमी राज्य सरकारने घेतली.
परंतु दुर्दैवाने काही लोक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरून मराठा समाजाचा बुद्धीभेद करत आहेत. मराठा समाजाने अफवावर विश्वास न ठेवता आरक्षणासाठी प्रभावीपणे पाउल उचाणाऱ्या राज्य सरकारवर विश्वास ठेऊन, सक्षम व कर्तबगार नेतृत्व पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहून विजयी करावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले.