20 मार्चला विधानभवनासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे जनजीवन मिशन 2024 पर्यंत देशातील प्रत्येक गावामध्ये पाणी पोहोचावे यासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे ही योजना बीडमध्ये सुद्धा सुरू असून बीड साठी तब्बल 1800 कोटीचा निधी खर्च होत आहे. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व निवेदन देऊनही याची चौकशी होत नसल्यामुळे अजय राऊत यांनी 20 मार्च रोजी विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज सुद्धा बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु बीड जिल्ह्याला आलेले 800 कोटी यातून अनेक गावचा पाणी प्रश्न मिटणार आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजय राऊत यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा संबंधित विभागाला तक्रारी देऊन सुद्धा हा प्रश्न किंवा याची चौकशी होत नसल्यामुळे त्यांनी आता चक्क विधान भवनासमोर 20 मार्चला आत्मदहन करणार असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.