देवस्थान जमिनी घोटाळा प्रकरणातील तपास अधिकारी बदलले
आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे असलेला तपास काढून घेतला!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवस्थान जमिनीत गैरप्रकार झालेले आहेत. यात मोठ मोठे पुढारी असल्याची शक्यता आहे. हे प्रकरण मोठे असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु गृहमंञी यांनी यात विशेष लक्ष दिले असून पंकज कुमावत यांच्याकडे असलेला तपास काढून घेण्यात आला असून आता यापुढे हा तपास डिवायएसपी संतोष वाळके यांच्याकडे देण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस महानिरीक्षक यांनी आज तसे पञ काढले आहे. यावरुन उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना नेमके यात कोणाला वाचवायचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्य़ातील आर्थिक गैरव्यवहार आणि वक्फ बोर्ड जमिन घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. जिल्ह्यातील हजारो एकर जमिनी हडप करण्यात आल्या आहेत. याची सखोल चौकशी व्हावी व यातील दोषी सर्वांपुढे यावेत यासाठी याचा तपास आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे देण्यात आला होता. यात पंकज कुमावत हे चांगला तपास करत असून लवकरच त्यांचा तपास पुर्ण होऊन यातील दोषी सर्वांपुढे येणार होते. परंतु हाच तपास पंकज कुमावत यांच्याकडून काढुन घेत तो तपास डिवायएसपी संतोष वाळके यांच्याकडे देण्याचे पञ आज पोलीस महानिरीक्षक यांनी काढले आहे. यामुळे गृहमंञी देवेंद्र फडणवीस यांना नेमके यात कोणाला वाचवायचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येथून सुञ फिरली!
प्रविण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या शिफारसीवरून उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशावरून पंकज कुमावत यांच्याऐवजी विशेष तपास आधिकारी म्हणून संतोष वाळके ,उपविभागीय पोलीस आधिकारी उपविभाग बीड यांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण मुळ कागदपत्रे संतोष वाळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावे असे आदेश के. एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद यांनी काढले आहेत.