प्रारंभ न्युज
जालना प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील राजुर येथे आज शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी भव्य रस्ता रोको केला. अतिवृष्टी अनुदानातून वगळलेल्या शेतकऱ्यांना मदत दया. तसेच 2021 च्या अग्रीम पिकविम्यातुन वगळलेल्या शेतकऱ्यांना 25% विमा व उर्वरित विमा तात्काळ दया ही मागणी केली. या आंदोलनात येथील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी शेतकरी कन्या तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी आक्रमक भाषण केले.
बीड जिल्ह्यात देखील गेवराई सहित अनेक तालुके अग्रीम विमा पासून वंचित आहे.त्यांना अग्रीम साहित संपूर्ण विमा तात्काळ मंजूर व्हावा यासाठी दिवाळी दिवशी थेट मा.कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही मागणी मान्य केली होती.आज देखील तहसीलदार यांनी वगळलेल्या मंडळाना सतत च्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आधारे नुकसानभरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले.4 दिवसांत प्रशासनाने याबाबत स्पष्टता न केल्यास 11 नोव्हेंबर रोजी चांदई येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.