पोलीस विभाग,महसूल विभागाच्या संयुक्त कारवाया सुरु
शिवनाथ काळे : गेवराई
गेवराई : आज संध्याकाळी शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाया करत अनेकांना दंड केला. अशा कारवाया जिल्हाभरात होणे गरजेचे आहे. कारण जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढ आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढत असल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. यात आज गेवराई तालुक्यात 18 नव्या रुग्णांची भर पडली. शहरात कोव्हिड नियमांचे पालन न करणाऱ्या अनेकांवर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी संयुक्त कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेकांवर विना मास्कच्या कारवाया करण्यात आल्या. बस मधील प्रवासांची सुद्धा तपासणी करण्यात आली. यात ज्यांनी मास्क घातला नाही, त्यांना 500 रुपयांचा दंड आकारला. या कारवाया सुरु झाल्यामुळे अनेकांनी नविन मास्क घालून पुढील प्रवास सुरु केला होता. जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेने कोव्हिड नियमांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.