मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ट्रेनी शिक्षकांच्या निवडीसाठी गरजवंत उमेदवारास प्राधान्य द्यावे
बीड, प्रतिनिधी- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रती शाळा एक प्रशिक्षणार्थी या प्रमाणे सुयोग्य व पात्र उमेदवारांची कागदपत्रे प्राप्त करून शाळेकरिता एका प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षकांची निवड करायाची आहे. मात्र संबंधित अधिकारी सरपंच व इतर लोकांच्या दबावाखाली येऊन स्वतःची नातलग संबंधी यांनाच गरज नसताना या योजनेचा फायदा करून देत आहेत. यामुळे तळागाळातील गरजू लोकांची हेळसांड होत असून या योजनेसाठी सर्वोपरी पात्र असलेल्या गोरगरीब कुटुंबातील उमेदवारास लाभ होत नसल्याच्या तक्रारी शिवसेना कार्यलयात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी योजना राबवत आहेत, त्या आमलात आणत आहेत. मात्र काही अधिकारी दबावतंत्रास बळी पडून गोरगरीब आणि गरजू माणसांच्या तोंडातला घास काढून नाते संबंधातील अपात्र उमेदवारास भरवत आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांना माझे कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी कुणाच्याही दबावाखाली न येता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रती शाळा एक प्रशिक्षणार्थी या प्रमाणे सुयोग्य व पात्र उमेदवारांची कागदपत्रे प्राप्त करून नियम अटींनुसारच शाळेकरिता एका प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षकांची निवड करावी. जर आपल्यावर कुणी दबाव टाकत असेल तर याची माहिती आम्हाला द्यावी. मात्र कुणाच्या दबावाखाली येऊन अपात्र उमेदवाराची निवड करू नये. अन्यथा शिवसैनिकांशी गाठ असेल आणि त्यांना शिवसेना स्टाईलनेच उत्तर देण्यात येईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी माध्यमांना पत्रक जारी करत अधिकाऱ्यांना सूचना आवाहन करून कडक इशारा दिला आहे.
*गरजवंत आणि पात्र उमेदवाराची हेळसांड कदापि सहन करणार नाही- अनिलदादा जगताप*
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रती शाळा एक प्रशिक्षणार्थी या प्रमाणे सुयोग्य व पात्र उमेदवारांची कागदपत्रे प्राप्त करून शाळेकरिता एका प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षकांची निवड करायाची आहे. मात्र संबंधित अधिकारी सरपंच व इतर लोकांच्या दबावाखाली येऊन स्वतःची नातलग संबंधी यांनाच गरज नसताना या योजनेचा फायदा करून देत आहेत. यामुळे तळागाळातील गरजू लोकांची हेळसांड होत असून या योजनेसाठी सर्वोपरी पात्र असलेल्या गोरगरीब कुटुंबातील उमेदवारास लाभ होत नसल्याच्या तक्रारी शिवसेना कार्यलयात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कुणाच्याच दबावाखाली न येता नियम अटीनुसारच काम करावे आणि मुख्यमंत्री योजनेचा लाभ गोरगरीब गरजवंत पात्र उमेदवारास द्यावा. गरजवंत आणि पात्र उमेदवाराची हेळसांड कदापि सहन करणार नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी माध्यमांना जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.