राष्ट्रवादीचा गट सत्तेत गेल्यानंतर शरद पवारांनी पञकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वच शांत होते. परंतु दुपारच्या नंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आणि राष्ट्रवादीचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झाला. काही वेळातच शपथविधी सोहळ्यासाठी राजभवन सजले आणि राष्ट्रवादी गटातून गेलेले तीस आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहिले. यावेळी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भुमिका स्पष्ट केली. आमचे काही गेलेले सदस्य, सहकारी त्यांची भुमिका दोन तीन दिवसात स्पष्ट करतील असे मत व्यक्त करत सत्तेतील नेत्यांची धाकधूक वाढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत त्यांनी भाजपाला टोला लगावला. दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टाचारी असल्याचे मत व्यक्त केलं होतं आणि आज त्याच पक्षातील काही सहकाऱ्यांना सत्तेत सहभागी करुन घेत त्यांच्यावर लावलेले आरोप पुसून काढल्याबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.