एकादिवसात वाहनांवर प्रलंबित असलेला 18 लाखाचा दंड वसूल
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : डिजिटल युगामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा डिजिटल झाले असून अनेक वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ऑनलाईन दंड आकारण्यात येतो. परंतु अनेक वाहनधारकांकडून हा दंड वेळेवर भरण्यात येत नाही. यामुळे बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यामध्ये प्रलंबित दंड वसूल मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये बुधवारी (ता. २९) दिवसभरामध्ये वाहतूक शाखेने 18 लाखाचा प्रलंबित दंड वसूल केला.
रस्ते अपघात रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनधारकांना विविध नेम घालून देण्यात आले आहे परंतु अनेक वाहनधारक अनेक वेळा नियमांचे उल्लंघन करताना दिसतात ज्या वांधारकांनी नियमांचे उल्लंघन केलं आहे त्यांच्यावर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येते ही कारवाई आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला सोपे झाले आहे एखाद्याने रस्ते वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं तर त्या वांधारकांच्या नंबर वर ऑनलाईन दंड करण्यात येतो परंतु हा दंड आकारल्यानंतर सुद्धा अनेक वाहनधारक प्रलंब ऑनलाईन प्रलंबित दंड वेळेवर भरत नाहीत यामुळे बीड जिल्हा वाहतूक शाखेने वाहनांवरील प्रलंबित दंड वसुली मोहीम सुरू केली असून यामध्ये काल दिवसभरात वाहतूक शाखेने तब्बल 18 लाख रुपयांचा प्रलंबित दंड वसूल केला. हि कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक श्री पेरगुलवार, सपोनी श्री काळे, पोउपनी श्री जागडे व वाहतूक शाखेतील अंमलदार यांनी केली.