• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, July 20, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home आरोग्य व शिक्षण

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

'पीएमश्री' योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता

Prarambh Team by Prarambh Team
March 30, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मुंबई, दि. ३० – केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या उपसचिव डॉ.प्रीती मीना यांनी यासंदर्भातील पत्र नुकतेच राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना पाठविले आहे. या पत्रात पीएमश्री योजनेसाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या, शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या ४२६ प्राथमिक आणि ९० माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी pmshrischools.education.gov.in या पोर्टलवर शाळांनी स्वतः अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांनी ऑनलाईन अर्ज केले. या टप्प्यांमध्ये पात्र ठरण्यासाठी शहरी भागांसाठी ७० टक्के तर ग्रामीण भागांसाठी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. हे टप्पे पार करणाऱ्या शाळांची तज्ज्ञांच्या समितीने निवड केली आहे.

पीएमश्री योजनेविषयी

केंद्र सरकारने ७ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेला मान्यता दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट कालावधीत आदर्श शाळा विकसित करणे तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविण्याचा या योजनेचा उद्देश आहे. याअनुषंगाने देशभरात एकूण १४,५०० शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाणार असून याअंतर्गत निवड झालेल्या सध्याच्या शाळा आदर्श शाळांमध्ये रूपांतरित होणार आहेत.

 

या योजनेतील करारानुसार निवड झालेल्या शाळांसाठी ६० टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार असून राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के असणार आहे. यासाठी राज्य शासन प्रती शाळा पाच वर्षांसाठी १.८८ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

राज्य शासनाने विविध उपक्रमांसाठी केलेली तरतूद

येत्या आर्थिक वर्षात राज्य शासनाने पीएमश्री योजनेच्या राज्याच्या हिस्स्यापोटी ९१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०२२-२३ मध्ये आदर्श शाळांसाठी ४७९ कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी २५४ कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. पुढील वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांसाठी १९९.४० कोटी तर माध्यमिकसाठी ५६.१२ कोटी इतका निधी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी ८६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षात १३५१ आयसीटी लॅब, २०४० डिजिटल लायब्ररी, १०,५९४ स्मार्ट क्लासरूम्स, शिक्षकांसाठी ९७,२४९ टॅबलेटस्, १०५ स्टेम लॅब, ५३३ टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत.

पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित होतील, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

पीएमश्री योजनेअंतर्गत मान्यता मिळालेल्या राज्यातील शाळांची जिल्हानिहाय संख्या

अकोला -११, अमरावती – १८, औरंगाबाद – ११, बीड – १३, भंडारा – १२, गोंदिया – १३, हिंगोली -५, जळगाव -१८, लातूर -१३, नागपूर -२१, नांदेड -१८, नंदुरबार -८, पालघर -११, परभणी -११, बुलढाणा -२२, चंद्रपूर -१८, उस्मानाबाद -९, अहमदनगर -२१, गडचिरोली -१६, कोल्हापूर -१८, नाशिक -२६, पुणे -२३, रायगड -२०, रत्नागिरी -१३, सांगली -१४, सातारा -१८, सिंधुदुर्ग -१३, सोलापूर -२३, ठाणे -१४, वर्धा -१३, वाशिम -७, यवतमाळ -२६, धुळे -७ आणि जालना जिल्ह्यातील -१२ शाळांना पीएमश्री योजनेअंतर्गत मान्यता मिळाली आहे.






Previous Post

गेवराई राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटू लागले

Next Post

कामाची वेळ संपून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सह्या सुरुच!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

मणिपूर घटनेचा जाहीर निषेध -आ.संदीप क्षीरसागर

डेंग्यू आजारावर तात्काळ उपाययोजना करा; आ.संदीप क्षीरसागरांची जिल्हाप्रशासनाकडे मागणी

October 3, 2023
Beed : मराठा आरक्षणासाठी शिक्षक सुद्धा आक्रमक; जिल्ह्यातील मराठा शिक्षकांनी घेतला हा निर्णय!

Beed : मराठा आरक्षणासाठी शिक्षक सुद्धा आक्रमक; जिल्ह्यातील मराठा शिक्षकांनी घेतला हा निर्णय!

September 7, 2023
बंसल क्लासेसचा दर्जा घसरला; पालकांमधुन संताप

बंसल क्लासेसचा दर्जा घसरला; पालकांमधुन संताप

April 14, 2023
माता सुरक्षित तर घर सुरक्षित : जिल्ह्यात ८८ हजार महिलांची तपासणी

माता सुरक्षित तर घर सुरक्षित : जिल्ह्यात ८८ हजार महिलांची तपासणी

October 8, 2022
ब्रेकिंग: GATE 2022 नोंदणी 2 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली, Gate.iitkgp.ac.in वर अर्ज कसा करावा ते येथे आहे

ब्रेकिंग: GATE 2022 नोंदणी 2 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली, Gate.iitkgp.ac.in वर अर्ज कसा करावा ते येथे आहे

September 1, 2021
डीआरडीओ भरती 2021: 54000 रुपये प्रति महिना प्लस एचआरए, संशोधन सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांसाठी आता अर्ज करा

डीआरडीओ भरती 2021: 54000 रुपये प्रति महिना प्लस एचआरए, संशोधन सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांसाठी आता अर्ज करा

September 1, 2021
UPSC EPFO ​​परीक्षा 2021: UPSC EPFO ​​भरती परीक्षा 5 सप्टेंबर रोजी होणार, तपशील पहा

UPSC EPFO ​​परीक्षा 2021: UPSC EPFO ​​भरती परीक्षा 5 सप्टेंबर रोजी होणार, तपशील पहा

August 31, 2021
भेल BHEL भरती 2021: 61 प्रशिक्षणार्थी रिक्त पदांसाठी अभियंत्यांकडून अर्ज मागितले जात आहेत

भेल BHEL भरती 2021: 61 प्रशिक्षणार्थी रिक्त पदांसाठी अभियंत्यांकडून अर्ज मागितले जात आहेत

August 31, 2021
विप्रो कंपनी मध्ये फ्रेशर्सची भरती सुरु, पात्रता निकष, इतर तपशील नक्की जाणुन घ्या

विप्रो कंपनी मध्ये फ्रेशर्सची भरती सुरु, पात्रता निकष, इतर तपशील नक्की जाणुन घ्या

August 31, 2021
पॉवरग्रिड भरती 2021: 1110 अपरेंटिस रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवली

पॉवरग्रिड भरती 2021: 1110 अपरेंटिस रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवली

August 29, 2021
Next Post
कामाची वेळ संपून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सह्या सुरुच!

कामाची वेळ संपून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सह्या सुरुच!

नारायण गडाच्या निधीसाठी शिंदे-फडणवीस सरकार कमी पडणार नाही; मंत्री संदीपान भुमरे नारायण गडावर नतमस्तक!

नारायण गडाच्या निधीसाठी शिंदे-फडणवीस सरकार कमी पडणार नाही; मंत्री संदीपान भुमरे नारायण गडावर नतमस्तक!

छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक रवाना होणार -जिल्हाप्रमुख अनिल जगताप

छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक रवाना होणार -जिल्हाप्रमुख अनिल जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
मध्यरात्री डीजे वाजवून तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करणार्यांना पोलिसांचा दणका

मध्यरात्री डीजे वाजवून तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करणार्यांना पोलिसांचा दणका

July 18, 2025

विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त शिवसंग्रामचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

होळ येथील राशन दुकानातून टेम्पोने आणलेले धान्य धारूरमध्ये पकडले!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा