बुथ प्रमुख,प्रचारकाची भूमिका बजावणार्या शिक्षक,संस्था चालक आणि कर्मचार्यांवर राज्य निवडणुक आयोगाचे कार्यवाही करण्याचे आदेश; आ.संदीप क्षीरसागरांनी केली होती तक्रार
बीड प्रतिनिधी :- एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी संस्था चालकास करोडो रूपयांचे अनुदान देवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत असून पण प्रस्थापितांच्या संस्था असलेल्या आदर्श शिक्षण संस्था बीड,नवगण शिक्षण संस्था नवगण राजुरी, विनायक युवक कल्याण संस्था बीड व आनंद कृषी प्रतिष्ठान या संस्थे अंतर्गत असलेल्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालय व आश्रम शाळेतील कर्मचारी,प्राध्यापक,शिक्षक,लिपीक,परिचर व इतर हुद्यावर असलेले कर्मचारी सर्व जणांचा वापर निवडणुक प्रसंगी बुथ प्रमुख आणि प्रचारकाच्या कामासाठी करून घरगड्यासारखी वागणुक देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून संस्था चालक करत असून आता अशा संस्थाची व संस्था चालकांवर आणि दबावापोटी काम करणार्या कर्मचार्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने यांच्यावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.बीड व जिल्हा निवडणुक अधिकारी यांची करडी नजर आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार देशातील गाव,तांडा,वाडे,वस्तीवरील तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम दर्जाचे शिक्षण पोहचावे यासाठी शिक्षणाच्या राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर अनेक योजना राबवित असून यापोटी जिल्ह्यातील प्रस्थापित संस्था चालकास या शिक्षक,कर्मचारी,प्राध्यापकांच्या वेतनापोटी करोडो रूपयांचे अनुदान संस्थेस देते. जेणेकरून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावा हा मुळ उद्देश राज्य व केंद्र सरकारचा आहे. पण हे संस्था चालक या संस्थेच्या कर्मचार्यांचा उपयोग ग्रामपंचायत निवडणुक,नगर परिषद निवडणुक,आमदारकी, खासदारकी अशा निवडणुकीच्या काळात प्रचारक, बूथ प्रमुख किंवा सामान्य कार्यकर्ता सारखा करून त्यांची पिळवणुक करत असून आदीच नोकरी देण्याच्या नावाखाली ज्या कर्मचार्यांकडून लाखो रूपयांचे आर्थिकमाया गोळा करायची आणि एखाद्या कर्मचार्याची पैसे देण्याची ऐपत नसेल तर दहा ते पंधरा वर्षे त्याच्या पगारमधून रक्कम कपात करून घेण्याचे काम संस्था चालक गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. यामुळे संस्थेतील शिक्षक, कर्मचार्यांवर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ आली असून मनौधैर्याने खचलेला हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे काय धडे देणार? असा प्रश्न पालकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पडत आहे. देशाचे भविष्य घडविणार्या भावी पिढीच्या शिक्षकांना असे कामे करावे लागत असतील या विद्यार्थ्यांचे भविष्य काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना गेल्या अनेक वर्षापासून पडला आहे. ही बाब शिक्षकांना पण मान्य नसून नोकरीपोटी किंवा दबावापोयी शिक्षक हे लाजीरवाणे काम करत आहे. अशा त्रासीत विद्यार्थी पालकांच्या आणि कर्मचार्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक वेळा तक्रारी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे आल्या होत्या. यावर आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे तातडीने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणार्या या शिक्षकांना गुलामगिरीतुन मुक्त करणेसाठी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे फलित आज असे आहे की, राज्य निवडणुक आयोगाने जिल्हाधिकारी,बीड व निवडणूक अधिकारी,बीड यांना तातडीचे आदेश देवून जिल्ह्यातील प्रस्थापित संस्था चालकाविरूद्ध व शिक्षक कर्मचार्यांविरूद्ध नजर ठेवून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांना दिलासा मिळाला असून अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत.
आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी तक्रार करून केला होता पाठपुरावा !
आदर्श शिक्षण संस्था बीड,नवगण शिक्षण संस्था नवगण राजुरी,विनायक युवक कल्याण संस्था बीड व आनंद कृषी प्रतिष्ठान या संस्थे अंतर्गत असलेल्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,महाविद्यालय व आश्रम शाळा यामध्ये सेवेत असलेले कर्मचारी,प्राध्यापक,शिक्षक,लिपीक,परिचर व इतर हुद्यावर असलेले कर्मचारी सर्व जण या आयटीआयच्या आवारामध्ये व निवडणुक प्रक्रियेमध्ये पॅनल प्रमुखाची भूमिका बजावतांना दिसून आल्याची तक्रार आ.संदीप क्षीरसागरांनी यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे केली होती. याची दखल घेत त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि निवडणुक अधिकारी यांना दिले आहेत.
संबंधित शिक्षक कर्मचार्यांची हजेरी पट,कॉल डिटेल्स,
मोबाईल लोकेशन आदींची तपासणी करणार का?
गावकर्यांनी या बाबतीत अनेकवेळा तक्रार केली असून दि.28 नोव्हेंबर ते आजपर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचार्यांनी शाळा आणि विद्यार्थी वार्यावर सोडले असून राज्य निवडणुक आयोग या शिक्षक कर्मचार्यांची हजेरी पट, कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन आदींची तपासणी करणार का? व शिक्षक हा शाळेत नसून ग्रामपंचायतचे निवडणुकीत बुथ प्रमुख व प्रचारकाची भूमिका बजावत असून हजारो विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक भविष्य अंधारात चालले असून या पापाची भरपाई प्रस्थापित व संबंधित संस्था चालकाला करावी लागणार.